• Fri. Apr 24th, 2026

टिप्पर- रिक्षा च्या धडकेत सहा गंभीर जखमी.

Bybaba maske

Feb 27, 2024

टिप्पर -रिक्षा च्या धडकेत सहा गंभीर जखमी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

धारुर तालुक्यातील थेटगव्हाणजवळ अॅपे व टिप्परची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मयत व जखमी हे तालुक्यातील अंबेवडगाव व गांवदरा येथील असल्याचे समजते. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात जखमींची नावे पुढील प्रमाणे आहेत. सुभाष बडे, रा. गांवदरा (वय 35), हौसाबाई घुले, रा. आंबेवडगाव (वय 80), भागवत घुले, रा. अंबेवडगाव (वय 60), संगिता रामा घोळवे, रा. अंबेवडगाव (वय 40), भागवत लक्ष्मण भांगे, रा. गांवदरा (वय 38), गवळण तिडके, रा. गांवदरा (85).

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!