• Sun. Apr 26th, 2026

बारावी परीक्षा देणाऱ्या मुलीचे घरातून अपहरण

Bybaba maske

Mar 14, 2024

बारावी परीक्षा देणाऱ्या मुलीचे घरातून अपहरण

रोखठोक न्युज वार्ताहर 

युसूफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

बारावीची परीक्षा देत असलेल्या १७ वर्षे सहा महिने वयाच्या मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

केज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही दुसऱ्या गावातील परीक्षा केंद्रावर १२ वीची परीक्षा देत होती. ६ मार्च रोजी रात्री मुलगी ही आई-वडिलांसोबत जेवण करून झोपली असता. मध्यरात्री २ वाजता तिचे वडील लघुशंकेसाठी उठले असता त्यांना मुलगी घरात दिसून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र ती मिळून न आल्याने शेवटी तिच्या वडिलांनी मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

युसूफवडगाव पोलिसांचे संपर्काचे आवाहन

अपहरण झालेल्या मुलीचा रंग गोरा, कपाळावर टिकली, अंगात पिवळसर रंगाचा टॉप व निळ्या रंगाची जिन्स पँट, निळसर रंगाचे जॅकेट, पायात चप्पल असे वर्णन असून या वर्णनाची मुलगी कुठे आढळून आल्यास युसूफवडगाव ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!