• Sun. Apr 26th, 2026

मनोज जरांगे-पाटील यांच्या सह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Bybaba maske

Mar 14, 2024

मनोज जरांगे-पाटील यांच्या सह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

खोटी माहिती प्रसारित करून सरकारविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप

रोखठोक न्युज वार्ताहर 

अंबाजोगाई – मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी (दि.१३) अंबाजोगाईत संवाद बैठक झाली. याप्रसंगी खोटी माहिती प्रसारित करून सरकार विरोधात प्रक्षोभक भाषण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लघन केल्याच्या आरोपावरून मनोज जरांगे यांच्यासह आयोजकांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

अंबाजोगाईत साधना मंगल कार्यालयात बुधवारी रात्री ८ वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, जरांगे पाटील यांना येण्यासाठी उशीर झाला आणि ही बैठक रात्री १० वाजताच्या नंतर सुरु झाली. त्यामुळे रात्री १० च्या नंतर ध्वनिक्षेपक चालू ठेऊन बैठकीसाठी दिलेल्या परवान्याचे आणि सर्वोच्च न्यालयाच्या आदेशाचे उलंघन केल्याच्या आरोप पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार मनोज जरांगे यांनी उपस्थित जनसमुदायासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून या शिंदे साहेबांनी आपला विश्वास तोडलाय. तुमची हुशारी तुमच्यापाशी ठेवा, मी कट्टर खानदानी आहे. तुम्ही जर पालक असाल तर तुम्हाला अंतरवलीतल्या महिला दिसल्या नाही का? त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या का केल्या? त्या महिला तुमच्या कोणीच नाहीत का? तुमच्या घरातील ती आई-बहिण आणि आमच्या मराठ्याच्या आई-बहिणीला इज्जत नाही का? नऊ वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी घातली, त्या लेकराची गोळी काढतांना दिड लिटर पाणी तिच्या पायातून निघाले, तिच्यात तुम्हाला आई-बहिण दिसली नाही का? तुम्हाला आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा, आम्ही तुम्हाला हिसका दाखवणारच.. असे जालना अंतरवेली येथील घटनेचा संदर्भ देऊन मुलीच्या पायाला गोळी लागल्याची अशी कुठलीही घटना घडलेली नसताना खोटी माहिती प्रसारित करून सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने सरकारविरोधात प्रक्षोभक स्वरूपाचे भाषण केले असा आरोप पोलीस कर्मचारी संतोष बदने यांच्या फिर्यादीत करण्यात आला आहे. सदर फिर्यादीवरून मनोज जरांगे आणि बैठकीचे आयोजक सचिन सुभाषराव जोगदंड (पाटील), राजेसाहेब देशमुख, ऍड. माधव जाधव, अमर देशमुख, अजित गरड, रणजीत लोमटे, अमोल लोमटे, राहूल मोरे, ऍड. जयसिंग सोळंके, ऍड. किशोर देशमुख, भिमसेन लोमटे आणि साधना मंगल कार्यालयाचे मालक रविकिरण श्यामसुंदर मोरे यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भादवि ५०५ (१)(ब), १८८, सहकलम म.पो.का १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!