धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांचा जंरागे पाटील होण्याचा प्रयत्न फसला.
निर्णय घेताच समाज उठून चालु लागला.
रोखठोक न्युज वार्ताहर
अंबाजोगाईत स्वतःच्या गावात चतुर वाडीत धनगर समाजाच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत यशवंत सेनेच्या बहुतांश कार्यकर्ते व नेत्यांना वाटत होते राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी बीड लोकसभेची निवडणूक लढवावी समाजाची ताकद दाखवावी यावर निर्णय घेण्यासाठी दोडतले यांच्या चतुरवाडी गावात यशवंत सेनेचा मेळावा दोडतले यांनी बोलावला सर्व वक्त्यांनी आपली भूमिका मांडली मात्र दोडतले यांनी अचानक लोकसभा निवडणुकीसाठी उभे असणाऱ्या उमेदवारांना फोन करून निवडणूक लढवण्याऐवजी यशवंत सेनेचा पाठिंबा देण्याची भूमिका घेतली यामुळे हाय व्होल्टेज ड्रामा झाला कोणत्याही निर्णयाविना मेळाव्याची सांगता झाल्याचे समजते
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बालासाहेब दोडतले यांनी काही दिवस उपोषण केले मोर्चा काढला त्यामुळे यशवंत सेनेचे कार्यकर्ते व नेत्यांना बाळासाहेब दोडतले यांनी लोकसभा निवडणूक लढवून समाजाची ताकद दाखवावी असे वाटत होते समाजातील तरुण कार्यकर्त्यांचा आग्रह झाल्याने आपल्या मूळ गावी चतुरवाडी येथे समाजाचा मेळावा बोलावला यावेळी उमेदवारांना फोन लावण्यात आले दोडतलेचे म्हणणे होते आरक्षण मिळवणे हा आपला उद्देश असून निवडणूक लढवणे हा आपला उद्देश नाही किंवा मी कधीही निवडणूक लढवायची अशी भूमिका घेतली नाही त्यामुळे आपल्या समाजाला आरक्षणाची जो हमी देईल त्याला समाजाने पाठिंबा द्यावा यामध्ये बाळासाहेब दोडतले यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार बजरंग सोनवणे आणि भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना फोन लावला व आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.
काय म्हटलंय पंकजा मुंडे व बंजरग सोनवणे यांनी.
धनगर समाजाला आम्ही यापूर्वी प्रतिनिधित्व दिले. आम्ही सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. गेले काही दिवस दुर्लक्ष झाले हे मान्य करते. पण येथून पुढे मी प्रतिनिधित्व देणार आहे. मला लेक समजून आशीर्वाद द्या, मी तुम्हाला अंतर देणार नाही. मी संसदेत पहिला प्रश्न धनगर समाजाचा मांडणार आहे, असे आश्वासन दिले. तसेच बजरंग सोनवणे यांनी देखील धनगर समाजाचे प्रश्न सोडविणार असल्याची भूमिका मांडली. यावर धनगर समाजाने आणखी एक बैठक घेण्याचा निर्णय जाहीर केला असून याच बैठकीत आता अंतिम निर्णय होऊ शकणार आहे.
बालासाहेब दौडतले यशवंत सेना राष्ट्रीय अध्यक्ष, माणिकराव डांगडेपाटील, प्रभाकर वाघमोडे,दत्ता काळे, अण्णासाहेब रुपणार, नितीन धायगुडे, वसंत शिमपले, अविनाश जाणकार, महेश पिंगले, ॲड. राजू शिंदे, बाळा गायके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भूमिका स्पष्ट करताना धनगर समाजाकडून बीड लोकसभेचा उमेदवार म्हणून बालासाहबे दौडतले यांना पसंती दिली. तसेच यावेळी प्रचारासाठी आर्थिक मदत करण्याची घोषणा करण्यात आली पण दोडतले यांनी यावर निर्णय दिला नाही.
मी बीड लोकसभा निवडणूक लढवावी ही समाजाची भावना आहे. भावना असली पाहिजे ,माझ्या उमेदवारी पेक्षा धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई माझ्यासाठी मोठी आहे. ती लढाई जिंकायची आहे. ही लढाई जिंकलो तर सात खासदार,42 आमदार हे धनगर समाजाचे होतील त्यामुळे माझ्या उमेदवारी मुळे धनगर समाजाच्या या प्रश्नाला बगल मिळू नये असं माध्यमांशी बोलताना यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालासाहेब दौडतले यांनी म्हटले. त्यांच्या या भुमिके नंतर धनगर समाज मंडप सोडून जाताना दिसला.
