• Wed. Aug 26th, 2026

विहिरीत आढळला २२ वर्षीय विवाहितेचा मृतदेह.घात की अपघात 

Bybaba maske

Apr 2, 2024

विहिरीत आढळला २२ वर्षीय विवाहितेचा मृतदेह.घात की अपघात 

रोखठोक न्युज वार्ताहर

२२ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत शिंदी (ता. केज) येथे सोमवारी (१ एप्रिल) दुपारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वैष्णवी सिद्धेश्वर जाधव ही महिला सोमवारी सकाळी शिवारातील त्यांच्या सजगनी नावाच्या शेतात काम करण्यासाठी गेली होती. दुपारी २.३० वाजता वैष्णवी या तरुण महिलेचा त्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच सहायक फौजदार राजू वाघमारे, होमगार्ड प्रकाश मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, विहिरीतून मृतदेह काढून उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. या महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून याप्रकरणी केज पोलिसांत सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या महिलेस एक लहान मुलगा आहे.

रोखठोक न्युज वार्ताहर 

  २२ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत शिंदी (ता. केज) येथे सोमवारी (१ एप्रिल) दुपारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वैष्णवी सिद्धेश्वर जाधव ही महिला सोमवारी सकाळी शिवारातील त्यांच्या सजगनी नावाच्या शेतात काम करण्यासाठी गेली होती. दुपारी २.३० वाजता वैष्णवी या तरुण महिलेचा त्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच सहायक फौजदार राजू वाघमारे, होमगार्ड प्रकाश मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली.

                 दरम्यान, विहिरीतून मृतदेह काढून उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. या महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून याप्रकरणी केज पोलिसांत सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या महिलेस एक लहान मुलगा आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!