शरीराला घातक रसायनयुक्त फळे शहरात विक्रीला.
प्रेस्टीसाईड केमिकल वापरतात त्यामुळे होतो कर्करोग.
आता पर्यंत कधीच फळ विक्रेत्यांन वर कारवाई नाही.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरात नव्हे तर बीड जिल्ह्य़ात रसायनयुक्त फळे फळविक्रत्या कडून विकले जात आहेत.केज शहरात तर फळविक्रत्याचा सुळसुळाट झाला आहे.अश्या केमिकल असलेल्या फळा मुळे सर्दी,खोकल्याचे रूग्ण शहरात वाढत आहेत त्यामुळे शहरातील दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे.फळ लवकर पिकावे म्हणून फळ विक्रेत्याकडून केमिकल चा यथेच्छ वापर होत आहे.स्वतःची आमदनी वाढण्या साठी फळ विक्रेत्याकडून जनतेच्या आरोग्याशी, जिवाशी खेळले जात आहे.
केज शहरातील प्रसिद्ध फिजीशयन डाॅक्टर बालासाहेब आस्वले यांच्या कडे विचारणा केली असता त्यांनी सांगितल की फळ लवकर पिकावे व जास्त दिवस टिकवण्या साठी काही केमिकल चा वापर फळ विक्रेत्याकडून केला जातो त्यात प्रेस्टीसाईड या केमिकल चा वापर केला जातो ज्यामुळे कर्करोगा सारखा गंभीर आजार होऊ शकतो.
उदाहरणार्थ: केळी घेताना केळी पिवळी दिसते पण केमिकल मध्ये पिकवल्याने त्याचे देठ हे हिरवेच असते.दोन दिवसात केळी संपुर्ण काळी पडते.अशेच आता आंब्याचा सिझन चालु होईल यात ग्राहकाला सांगीतल जात की अंबा हा एसी मध्ये पिकवला जातो पण ग्राहक कधीच त्या गोडाऊन पंर्यत जाऊन बघत नाही तो कशात पिकवला जातो तो पण केमिकल मध्येच पिकवतात.वरी जरी अंबा पिकलेला वाटत असेल तर आत मध्ये पांढरा व अंबट असतो.
आता पर्यंत या फळ विक्रेत्यांन वर कुठलीच कारवाई होत नाही त्यामुळे यांचा निडरपणा वाढला आहे. त्यामुळे फळ विक्रेत्यांचे लायसन्स तपासून केमिकल युक्त आरोग्यस धोकादायक फळ विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
