• Sun. Apr 26th, 2026

दुपारची नमाज पडून येणाऱ्या तरूणाला ट्रकने उडविले. ट्रकचालकाने मद्यप्राशन केले होते

Bybaba maske

Apr 2, 2024

दुपारची नमाज पडून येणाऱ्या तरूणाला ट्रकने उडविले.

ट्रकचालकाने मद्यप्राशन केले होते

रोखठोक न्युज वार्ताहर 

गेवराई – भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वाराला उडविल्या

ने झालेल्या अपघातात तरूणाचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास तलवाड्यातील एकमिनार मस्जीदसमोर घडली. अपघातानतर पळुन जाणाऱ्या ट्रक चालकाला पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले.

गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील बम्गेवाडी येथील इनूस शेख (वय ३२) हे दुपारची नमाज अदा करून मोटारसायकलवर गावाकडे निघाले असता समोरून येणाऱ्या १२ टायर ट्रक क्र.एम.एच. २३.डब्ल्यु. ९४०० ने शेख यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात शेख यांचा जागीच मृत्यु झाला. रोजा असलेल्या शेख यांच्या अपघाती मृत्यूनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. घटनेची माहिती कळताच सपोनि सोमनाथ नरके आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. ट्रक चालक मद्यप्राशन केलेला होती अशी माहिती समोर आलेली आहे तसेच ट्रकमालक हा नेकनूर येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे व या गुन्हयात ट्रकमालकाला सह आरोपी करावी अशी मागणी नातेवाईक करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!