• Tue. Aug 25th, 2026

पंकजाताई मुंडे यांच्या नंतर प्रितमताई मुंडे यांच्या ताफ्या समोर मराठ्यांच्या घोषणा.

Bybaba maske

Apr 3, 2024

पंकजाताई मुंडे यांच्या नंतर प्रितमताई मुंडे यांच्या ताफ्या समोर मराठ्यांच्या घोषणा.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याकडून बीड जिल्ह्यात गाठीभेटी सुरू आहेत. याच अनुषंगाने डॉक्टर प्रीतम मुंडे ह्या परळी मतदारसंघातील राडी या गावी मंगळवार दि.2एप्रिल रोजी सायंकाळी 8.00 ते 8.30 च्या दरम्यान कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेल्या त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामना करावा लागला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत समाजाला आव्हान केले होते. लढायचं नाही तर उमेदवारांना पाडायचे आहे.

बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आहेत. आणखी शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर झाला नाही. मात्र मुंडे यांच्या कडून जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांच्या गाठीभेटी घेत आहेत. पंकजा मुंडे यांच्या बहीण डॉ.प्रीतम मुंडे ह्या परळी मतदारसंघातील राडी या गावी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेल्या. यावेळी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. प्रीतम मुंडे यांचा ताफा गावात शिरताच मराठा समाजाकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. एक मराठा लाख मराठा’, “चले जाव, चले जाव मराठा विरोधी चले जाओ अश्या पध्दतीने घोषणा बाजी करण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा निवडणूकित समोर आला असून राजकीय पुढाऱ्यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे, नंदकिशोर मुंदडा यांना देखील मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला होता.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!