• Sun. Apr 26th, 2026

शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला, 8 जणांनी गाडी अडवून केली बेदम मारहाण

Bybaba maske

Apr 4, 2024

शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला, 8 जणांनी गाडी अडवून केली बेदम मारहाण

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड : एकीकडे लोकसभेच्या निवडणुकांची तयारी सुरु आहे तर दुसरीकडे बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर 8 जणांनी गाडी अडवून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणीतही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. 

शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे हे बीडवरून म्हाळस जवळा या गावाकडे निघाले असता त्यांची वाटेतच सात ते आठ जणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ज्ञानेश्वर खांडे गंभीररित्या जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

तसेच खांडे यांच्यासोबत असणाऱ्या इतर दोघांनाही मारहाण केली असून ते दोघेही या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा हल्ला नेमका कोणी केला? कशासाठी केला? याचा कारण अजूनही अस्पष्ट आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!