फेसबुक मैत्री आली अंगलट,नवर्याला मेसेज दाखवतो, धमकी देत महिले वर बलात्कार.
रोखठोक न्युज वार्ताहर
बीड / आपण मैत्री करताना कोणत्या व्यक्तीबरोबर करतो याचे भान ठेवून वागले पाहिजे. महिला आणि पुरूषाची मैत्री कधी अंगलट येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करताना आपल्याला त्यापासून काही इजा पोहचणार नाही याची खात्री केली पाहिजे. खात्री न केल्यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात याचाच प्रत्यय परळीतील महिलेला आला आहे. बीडच्या मुलासोबत पोबत फेसबुकवर मैत्री केली आणि त्याच मैत्रीतून सदरील महिलेवर अत्याचार करत पतीला व सदरील महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे
परळी वै येथील शारदानगर भागातील ३२ वर्षिय गृहिणी महिलेने फेसबुकवर झालेल्या मैत्रीनंतर आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाबाबत बीड येथील एका आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. यातील आरोपी अकबर बबन शेख वय २३ वर्षे रा. तेलगावनाका ईंदिरानगर बीड याने फिर्यादि महिलेशी फेसबुक अकाउन्टवर ओळख करुन घेतली. त्यानंतर सततच्या चॅटिंगमध्ये मैत्री पुढे गेली. विविध प्रकारची माहिती देवाणघेवाण झाली. त्यानंतर आरोपीने गैरफायदा घ्यायला सुरुवात करुन फिर्यादिस ब्लॅकमेल करणे सुरु झाले. आरोपीने फिर्यादिचे
राहते घरी शारदानगर परळी वै येथे जावुन फिर्याट्चेि ईच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. तसेच दिनांक दिनांक दिनांक १३/३/ २०२४ रोजी फिर्यादिचे पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादि महिलेला चापटा बुक्याने मारहाण केली. दिनांक ०२/०४/२०२४ रोजी फिर्यादिचे घरी कोणी नसताना सकाळी ९.४० वा. सुमारास आरोपी घरी जावुन तु मला कॉल करून का बोलत नाहीस असे म्हणून फिर्यादिचे अंगावर जावुन वाईट हेतुने हात पकडुन फिर्यादिचा विनयभंग केला. त्यास प्रतीकार करत असताना त्याने फिर्यादिस उचलुन जमीनीवर आपटले. त्यावेळी आरोपीने हातातील काहीतरी डोक्यात मारुन जखमी केले. त्याने उजवा हात दाबुन धरल्याने हातातील बांगड्या फुटुन हातालाही जखम झाली आहे. अशा आशयाची फिर्याद दिल्यानंतर आरोपी अकबर बबन शेख वय २३ वर्षे रा. तेलगावनाका ईंदिरानगर बीड याच्याविरुद्ध परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यातगुरनं ४६/२०२४ कलम ३७६, ३५४, ३५४ (ऊ), ४५२,३२३,५०६ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या गंभीर प्रकरणी पिंक पथक अंबाजोगाई च्या पोउपनि प्रतिभा एम. शेटे, संभाजीनगर पोनि शेख, सपोनि प्रविण जाधव, पोअं. भगवान गुट्टे आदींनी पुढील तपास करीत आरोपी अकबर बबन शेख वय २३ वर्षे रा. तेलगावनाका ईंदिरानगर बीड यास अटक केली आहे.
