• Sun. Apr 26th, 2026

अनोळखी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला ओळखत असाल तर पोलिसांना कळवा,पोलीसप्रमुखाचे अहवान

Bybaba maske

Apr 4, 2024

अनोळखी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला

ओळखत असाल तर पोलिसांना कळवा,पोलीसप्रमुखाचे अहवान.

रोखठोक न्युज वार्ताहर 

अशोक दत्तात्रय कदम राहणार कोळ कानडी तालुका आंबेजोगाई यांच्या शेतात आज सकाळी 9:40 वाजता पुरुष जातीचे पाण्यावर तरंगताना प्रेत आढळल्याने, कोळ कानडी पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक दत्तात्रय कदम राहणार कोळ कानडी तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड हे नव्या खोदलेल्या आपल्या शेतातील विहिरीवर, आज सकाळी नऊ वाजून 40 मिनिटांनी गेले असता, विहिरीत पाण्यावर एका पुरुष जातीचे प्रेत तरंगताना दिसले. सदरील माहिती गावच्या पोलीस पाटलांमार्फत, आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक , श्री रामा पडवळ यांना कळवली. त्यांनी पोलीस कर्मचारी देशमाने, उळे, घुगे व इतर कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन, सदरील प्रेत विहिरीतून शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढले. ते अनोळखी असून, शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. शिवाय या प्रेताची ओळख पटविण्याचे पोलिसांमार्फत शर्तीचे प्रयत्न चालू असून, या प्रेताची कोणास ओळख पटल्यास, पुढील दूरध्वनी वर संपर्क साधावाा, असे आवाहन, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामा पडवळ यांनी केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!