• Sun. Apr 26th, 2026

जिवाची वाडी साठवण तलावातील अवैध्य पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंप, पाईप प्रशानाचे जाळेले. उपजिल्धिकारी दिपक वांजळे, तहसीलदार अभिजित जगताप यांची कारवाई.

Bybaba maske

Apr 7, 2024

जिवाची वाडी साठवण तलावातील अवैध्य पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंप, पाईप प्रशानाचे जाळेले.

उपजिल्धिकारी दिपक वांजळे, तहसीलदार अभिजित जगताप यांची कारवाई.

रोखठोक न्युज 

येवता:प्रतिनिधी:आप्पाराव सारूक

दि.०६ रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील साठवण तलावातील अवैद्य पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंप मोटारीचे पाईप अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी दिपक वाजळे व केज तहसीलदार अभिजीत जगताप यांनी साठवण तलावावर प्रत्यक्ष जाऊन धाडसी कारवाही केली आहे असे की जीवाचीवाडी साठवण तलावातील अवैधरित्या पाणी उपसा होत असल्याबाबतची लेखी तक्रार नारायण गोवर्धन चौरे यांनी तहसीलदार केज यांना केली होती.  केज तहसीलदार अभिजीत जगताप यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी प्रत्यक्ष तलावाला भेट देऊन कारवाईचा बडगा उचलत केज नगरपंचायत चे कामगार व ट्रॅक्टर यास पाचारण केले असता सरपंच पती दीपक काळे व काही शेतकऱ्यांनी विनंती करून दोन दिवसाचा अवधी मागितला यावर तहसीलदार केज यांनी तूर्तास कार्यवाही टाळली परंतु तलावातील 75 टक्के शेतकऱ्यांनी आपापले विद्युत पंप तलावा बाहेर काढून घेतले मात्र काही गुंड शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत तलावातील विद्युत मोटर बाहेर काढण्याची ऐवजी तलावातच ठेऊन रात्रीच्या वेळी अवैध्य पाणी उपसा करत होते,याची बातमी रोखठोक न्युज ने केल्यानंतर दि.o६रोजी  अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी दिपक वाजंळे व केज तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या सर्व फौज फाट्यासह दि.०६ रोजी दुपारी ०३:००वा.दरम्यान तलावास भेट देऊन शेतकऱ्यांस तलावातील विद्युत मोटार,पाईप,वायर,स्टार्टर बाहेर काढण्यास आदेश दिले अनेक शेतकऱ्यांनी तलावा बाहेर आपापले विद्युत पंपचे साहित्य काढले मात्र काही मगरुर वृत्तीच्या शेतकऱ्यांनी उप जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी हुज्जत घालीत मोटार पाईप काढण्यास स्पष्ट नाकार दिला यावर दिपक वाजंळे यांनी केज पोलिसांना पाचरण करून तहसील कार्यालयाचे कर्मचारी,जलसंपदा कार्यालयाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी यांना बरोबर घेऊन तलावातील न काढलेले पाईप जाळून टाकले उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या धाडशी निर्णयामुळे परिसरातील व गावकऱ्यांनी या धाडसी कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केलेचे पहावयास मिळत आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!