• Tue. Aug 25th, 2026

वंचित बहुजन आघाडी कडून अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर..!

Bybaba maske

Apr 7, 2024

वंचित बहुजन आघाडी कडून अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर..!

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवार कोण असेल? याची उत्सुकता आता संपलेली आहे.

• वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशोक हिंगे यांच्या उमेदवारीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.आशोक हिंगे हे वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा अध्यक्ष असून ते बाळासाहेब आंबेडकर यांच्या अत्यंत जवळचे असून त्यांनी मराठवाडय़ात जिल्हा निहाय मोठ मोठे मेळावे घेऊन मराठवाडय़ात वंचित बहुजन आघाडी ची पक्ष बांधनी केली आहे.तसेच ते मराठा आरक्षणासंदर्भात ही खूप सक्रीय होते.त्यांच्या युवक काळा पासुन ते मराठा आंदोलनात सक्रिय असतात.त्याचबरोबर त्यांना दलित, मुस्लिम वर्गात मानणारा वर्ग ही खूप मोठा आहे. याच कारणाने आज त्यांच्या गळ्यात वंचित बहुजन आघाडीची माळ पडल्याच बोलले जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!