• Sat. Apr 18th, 2026

डाॅ अशोक थोरात यांचे श्रेया हॉस्पिटल पुन्हा जनतेच्या सेवेत. कुटुंब कल्याण शस्रक्रिया श्रेया हॉस्पिटल येथे मोफत करण्यात येणार आहेत.

Bybaba maske

Apr 7, 2024

डाॅ अशोक थोरात यांचे श्रेया हॉस्पिटल पुन्हा जनतेच्या सेवेत.

कुटुंब कल्याण शस्रक्रिया श्रेया हॉस्पिटल येथे मोफत करण्यात येणार आहेत.

रोखठोक न्युज वार्ताहर 

स. न. १९९६ ते २०१७ तब्बल बावीस वर्ष श्रेया हॉस्पिटल केज तालुक्यातील व जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत कार्यरत होते.

या कालावधीत डाॅक्टर अशोक थोरात व त्यांच्या पत्नी डाॅक्टर प्रतिभा थोरात यांनी खुप चांगली सेवा दिली.डाॅक्टर अशोक थोरात हे स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ व शल्यचिकीत्सक असल्याने सर्व उपचार केज येथील त्यांच्या श्रेया हॉस्पिटल येथे भेटत होते.रात्री अपरात्री केंव्हाही रूग्णांना उपचार भेटत असल्यामुळे हे हाॅस्पिटल आपले वाटत असे.

पण डाॅक्टर थोरात हे जिल्हा शल्यचिकीत्सक झाले व हॉस्पिटल काही कालावधी साठी बंद करण्यात आले.पण आता श्रेया हॉस्पिटल चा नव्याने शुभारंभ दि ०९/०४/२०२४ रोजी स ११:३० वाजता पुनश्च सेवेत येत आहे.

  डॉ तेजस जीवनराव थोरात रेडिऑलॉजी या विषयात व त्याची पत्नी डॉ योगेश्वरी प्रसूतीशास्र व स्त्रीरोग या विषयात पदव्युत्तर प्रशिक्षण घेऊन श्रेया हॉस्पिटल येथे सेवा देणार आहेत. डॉ. तेजस यांनी डी एम आर ई पदवी प्राप्त केल्याने सोनोग्राफी चा तज्ञ म्हणून व डॉ.योगेश्वरी या एम एस असून केज शहरात प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग या विषयातील एकमेव पदवीधारक म्हणून सेवा देणार आहेत. त्याच बरोबर या रूगणालयात सामान्य शस्रक्रिया, कॅन्सर शस्रक्रिया, मूत्ररोग शस्त्रक्रिया व मोतीबिंदु शस्रक्रिया ची सेवा सुरु करण्यात येणार आहेत. अनेक वर्षांच्या केज परिसरातील जनतेच्या भरभरून दिलेल्या प्रेमातून उतराई होण्यासाठी यापुढे कुटुंब कल्याण शस्रक्रिया श्रेया हॉस्पिटल येथे मोफत करण्यात येणार आहेत. तरी या सेवेचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावे असे अहवान डॉ अशोक थोरात,डॉ प्रतिभा थोरात यांनी केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!