• Mon. Apr 27th, 2026

छेडछाडीला कंटाळून १४ वर्षीय शाळकरी मुलीची आत्महत्या.दोन युवकांवर गुन्हे दाखल.

Bybaba maske

Apr 14, 2024

छेडछाडीला कंटाळून १४ वर्षीय शाळकरी मुलीची आत्महत्या.दोन युवकांवर गुन्हे दाखल.

रोखठोक न्युज वार्ताहर 

दोन तरुणांकडून छेडछाड व त्रासास कंटाळून १४ वर्षीय शाळकरी मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना औरंगपुर (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

      औरंगपुर येथील मयत हर्षदा दत्तात्रय फस्के (वय १४) ही शाळकरी मुलगी बनसारोळा येथील आदर्श कन्या विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होती. ती शाळेत जात असतांना तिची कुंबेफळ येथील संकेत राहुल शिंदे व सोमनाथ रघुनाथ डिवरे ही दोन मुले नेहमी छेड काढायचे, तिला दुचाकीवरून अडवून त्रास द्यायचे. तर कधी कधी खडे मारून त्रास देत असल्याचे तिने बऱ्याच वेळा सांगितल्याने तिचा वडील व चुलत्याने सदर मुलांच्या आई – वडिलांना भेटून प्रकार सांगितला होता. त्यांनी समजावून सांगून ही त्यांच्यात फरक पडला नव्हता. परत दोन महिन्यापूर्वी त्या दोघांनी छेड काढल्याने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते दोघे आमच्या सोबत चल, तू नाही आलीस तर तुझे बघतोत. अशी धमकी देत होते. मात्र त्यांनी गरिबी परिस्थिती व मुलीच्या इज्जतीपोटी हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. २ एप्रिल रोजी ती परीक्षेला गेली असता त्या दोघांनी आमच्या सोबत चल, नाही तर परीक्षा देऊ देत नाहीत असा दम दिल्याने तिने घरी येऊन हा प्रकार सांगितला. मात्र तिच्या वडील व चुलत्याने आम्ही आहोत, तू परीक्षेला जा असे म्हणून परीक्षेला पाठविले. त्यांच्या त्रासामुळे मानसिक तणावात असलेल्या हर्षदा फस्के हिने ५ एप्रिल रोजी दुपारी पेपर सुटल्यानंतर घरी येऊन शेतात फवारणीचे मार्शल नावाचे विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र १२ एप्रिल रोजी सकाळी १०.१५ वाजता हर्षदा हिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिचे चुलते गणेश दिंगाबर फस्के यांच्या फिर्यादीवरून संकेत राहुल शिंदे, सोमनाथ रघुनाथ डिवरे या दोघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे पुढील तपास करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!