• Mon. Apr 27th, 2026

कार ॲपेरिक्षाची धडक महिला ठार तर चार जखमी.

Bybaba maske

Apr 14, 2024

कार ॲपेरिक्षाची धडक महिला ठार तर चार जखमी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

ॲपेरिक्षाने एका कारला धडक दिल्याने ॲपेरिक्षा पलटी होऊन या अपघातात ॲपेरिक्षातील प्रवासी महिला जागीच ठार झाली असून इतर चार प्रवासी जखमी झाल्याची घटना केज शहरात कळंब रस्त्यावर घडली. 

     चिंचोलीमाळी (ता. केज) येथील मेव्हण्याचा रक्षा सावडण्याचा कार्यक्रम आटपून कमल मिट्टू शिंदे (वय ६०, रा. परळी), अरुण कदम (रा. मासापूर जवळा ता. बीड), जगन्नाथ शिंदे(रा. परभणी), चंपाबाई कटारे ( रा. दिंद्रुड), दिलीप राऊत (रा. कानडीमाळी) हे आपापल्या गावाकडे जाण्यासाठी चिंचोलीमाळी येथून ॲपेरिक्षाने केजकडे येत होते. १३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास कळंब रस्त्याने येत असताना शहरातील फुले नगरकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ आले असता ॲपेरिक्षा चालक खय्युम दस्तगीर शेख (रा. चिंचोलीमाळी) याने ॲपेरिक्षा हा भरधाव वेगात हयगई व निष्काळजीपणाने चालवून कारला जोराची धडक दिल्याने ॲपेरिक्षा पलटी झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कमल मिट्टू शिंदे यांचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. तर अरुण कदम, जगन्नाथ शिंदे, चंपाबाई कटारे, दिलीप राऊत हे चौघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर चालक खय्युम दस्तगीर शेख हा ॲपेरिक्षा सोडून पळून गेला. दिलीप गोवर्धन राऊत (रा. कानडी माळी) यांच्या फिर्यादीवरून ॲपेरिक्षा चालक खय्युम दस्तगीर शेख विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार श्रीकांत चौधरी हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!