• Mon. Apr 27th, 2026

नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांना कोण वाचवतय? जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे  लक्ष्मण धस यांची बदली कधी? बदली कालावधी पुर्ण,जिल्ह्य़ातील रहिवाशी तरी बदली नाही. निवडणूक आयोगाला निवेदन देऊन ही कारवाई नाही?

Bybaba maske

Apr 15, 2024

नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांना कोण वाचवतय?

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे  लक्ष्मण धस यांची बदली कधी?

बदली कालावधी पुर्ण,जिल्ह्य़ातील रहिवाशी तरी बदली नाही.

निवडणूक आयोगाला निवेदन देऊन ही कारवाई नाही?

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तहसील कार्यालयातील मुजोर, कुचके,कामचुकार अशी ओळख असलेले नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांची बदली काही होत नाही.गेल्या 20 मार्च 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष बाबासाहेब अंबादास मस्के यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी ( बीड जिल्हाधिकारी) यांना निवेदन दिले त्यात अशी मागणी केली होती की केज तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांचा केज येथील कालावधी तीन वर्ष पूर्ण होऊन गेले आहेत तसेच ते केज तालुक्यातील सारणी- सांगवी या गावचे रहिवासी असून त्यांनी कागदोपत्री पत्ता हा बीड शहरातील दाखवला आहे. 

ते जर केज तहसील कार्यालयात नायबतहसीलदार पदावर कार्यरत रहातील तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निवडणूक कामात त्यांचा सहभाग येऊ शकतो तसेच त्यांचा तीन वर्षाचा कालावधी संपलेला असताना त्यांची बदली का होत नाही.जिल्हाधिकारी या निवेदनाची दखल का घेत नाहीत? ते अश्या मुजोर अधिकाऱ्यांवर ऐवढ्या मेहरबान का आहेत? याचे गुपित उघडकीस येत नाही.

महसूल नायब तहसीलदार पदाचा कारभार त्याच्या कडे आहे त्यांच्या कार्यकाळात 5 स्टोन क्रशर बोगस चालत होते ते या महाशयास मागमूस नव्हता.

महसूल प्रकारणातील शेता तील भांडणाच्या फाईल यांच्या टेबल वरच्या कधीच पूर्णत्वास जात नाही फाईलीचे गठ्ठेच्या गठ्ठे यांचा समोर पडलेले असतात.यांच्या कडून फक्त तारीख भेटली जाते.

मग अश्या अधिकाऱ्यांला का वाचवले जाते यांचे कारण समजत नाही.आदर्श आचारसंहितेचा जर असे उल्लंघन जर निवडणूक निर्णय अधिकारीच करत आहे तर मग या बीड जिल्ह्य़ात काय चाललंय हे सामान्याच्या अकलन च्या बाहेर चे आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!