• Mon. May 25th, 2026

झाडून सगळे श्रीमंत मराठे भाजपच्या प्रचारात तर गरीब मराठे अंदोलनात. मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेने मराठे गोंधळले आहेत,जसे राज ठाकरेच्या भुमिके मुळे मनसे कार्यकर्त.

Bybaba maske

Apr 15, 2024

झाडून सगळे श्रीमंत मराठे भाजपच्या प्रचारात तर गरीब मराठे अंदोलनात.

मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेने मराठे गोंधळले आहेत,जसे राज ठाकरेच्या भुमिके मुळे मनसे कार्यकर्त.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड लोकसभेच्या रिंगणात प्रचाराला जोर आला आहे,अजून उमेदवारी अर्ज कुठल्याच उमेदवारानी भरला नाही पण प्रचारात रंगत आली आहे.आता पर्यंत सत्तेत राहीलेले सर्व मराठे आष्टी-पाटोदा पासुन सुरुवात केली तर आमदार सुरेश धस,बीड-गेवराई अमरसिंह पंडित,विजयसिंह पंडित,बीड,अनिल जगताप,राजेंद्र मस्के,माजलगाव-धारूर, प्रकाश सोळंके,रमेश आडसकर, मोहन जगताप, डाके,केज पुन्हा रमेशराव आडसकर,,सर्व राजकीय घराणे व यांच्या आजुबाजूचे चेले चपाटे ज्यांनी यांच्य सत्तेचा लाभ घेतला आहेत किंवा घेत आहेत असे सर्व भाजपचा प्रचार  करताना दिसत आहेत.मोठ मोठ्या रॅल्या,बैठकांचा जोर लावत आहेत कारण लोकसभेच्या निवडणुकी नंतर सहा महिन्यात पुन्हा विधानसभेची निवडणूक आहेत या मध्ये बहुतांशी राजकीय घराण्यातील राजे, युवराज यांना निवडणूक लढवायची आहे.त्या साठी कोण किती लीड देतय याच्या साठी शर्यत लागली असल्याच चित्र आहे.

तर अशोक पाटील,रजनीताई पाटील, ज्योतीताई मेटे यांचे तळ्यात मळ्यात चालु आहे. यांची गणती सुद्दा सत्ताधारी श्रीमंत मराठ्यात होते.ज्योतीताई मेटे यांचे दिवंगत पती हे दोन वेळेस आमदार होते.

तर दुसरी कडे गरीब मराठा आरक्षणा साठी हवालदिल झाल्याचे पाहिला मिळत आहे.गावात आलेल्या उमेदवारा समोर आरक्षण समर्थनार्थ घोषणा देणे,उमेदवाराला विरोध करणे ऐवढेच काम गरीब मराठा करत आहेत.

सगळेच गरीब मराठा मनोज जरांगे-पाटील यांच्या कडे डोळे लावून बसले आहेत. मनोज जरांगे-पाटील यांनी सुद्धा या निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सारखी गोल गोल भुमिका घेतली आहे.त्यामुळेच गरीब मराठा गोंधळलेला आहे तर घराणेशाही वाला सत्ताधारी श्रीमंत  मराठा पुढील राजकीय भवितव्या साठी जीवतोड पळतोय.

गरीब मराठा व सत्ताधारी मराठ्यात सध्या तरी उभी फुट पडलेली दिसत आहे पण सत्ताधारी मराठा आपली चाल खेळणे चालु आहे त्यामुळेच गरीब मराठा या राजकीय बुद्धिबळाच्या पटावर कुठे तरी पिछाडीवर असल्याच दिसत आहे.

दोन मराठा उमेदवार एक वंचित बहुजन आघाडी कडुन तर एक मराठा राष्ट्रवादीकडून आपल नशीब आजमावून पहातोय.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!