• Mon. Apr 27th, 2026

देशी कट्टा दोन जिंवत काडतुसासह एक जण ताब्यात. निवडणूकीच्या तोंडावर परळी मधील घटना.

Bybaba maske

Apr 16, 2024

देशी कट्टा दोन जिंवत काडतुसासह एक जण ताब्यात.

निवडणूकीच्या तोंडावर परळी मधील घटना.

रोखठोक न्युज वार्ताहर 

परळी शहरातून देशी गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. संभाजीनगर परळी वै. पोलीसांनी ही कार्यवाही केली आहे.

संभाजीनगर पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, सुरजसिंग प्रेमसिंग जुन्नी रा फुलेनगर परळी हा उड्डुणपुला खाली थांबला असुन त्याच्या जवळ गावठी कट्टा आहे. पोलीस कर्मचारी व दोन पंचासह रवाना होवुन सुरजसिंग प्रेमसिंग जुन्नी रा. फुलेनगर परळी हा उड्‌डाणपुला खाली शिदी खाण्याचे समोर मिळून आला पंचा समक्ष त्याची अंगाची झडती घेतली असता त्याच्या कंबरेला उजव्या बाजुस पॅन्टंमध्ये खोवलेला एक सिल्वर रंगाचा स्टेनलेस स्टीलचा गावठी बनावटीचा मॅगझीनसह कटटा (पिस्टल), त्यास पकडण्यासाठी स्टीलची मुठ व त्यावर ग्रीप करीता चॉकलेटी रंगाचे प्लास्टीक कव्हर असलेला असा जुना वापरता कि.अ.४०,०००/- रुपये व मॅगझीन मध्ये दोन जिवंत काढतुस १०००/- रुपये असे गावठी कटटा व काढतुस दोन्हीची एकुण किमंत ४२,०००/- रुपयेचा मुद्देमालासह मिळुण आल्याने दोन पंचासह जप्ती पंचनामा करुन मुदेमाल व आरोपी ताब्यात घेवुन त्या वरुन. संभाजीनगर गु.र.न ५५/२०२४ कलम कलम ३/२५, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.उपनि ए.टी. शिंदे करीत आहेत. पो.नि उस्मान शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप नि शिंदे, पोह/भांगे, पोना/सानप, पोना मस्के, पोना/ शिंदे, पोकों/ फड, पोकों गुट्टे यांनी ही कारवाई केली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!