• Mon. Apr 27th, 2026

सोशल मीडिया पंकजा मुंडे यांना अडचणीत आणणार. अगोदरच भाजप ला जुमला पार्टी म्हणून संबोधतात

Bybaba maske

Apr 17, 2024

सोशल मीडिया पंकजा मुंडे यांना अडचणीत आणणार.

अगोदरच भाजप ला जुमला पार्टी म्हणून संबोधतात.

रोखठोक न्युज वार्ताहर 

काल पासुन सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्या सोशल मीडिया प्रमुखा कडून एक पोस्ट व्हायरल होते त्यात असे दर्शवण्यात आले आहे की पंकजाताई पालकमंत्री असताना प्रत्येक तालुक्याच्या क्रीडा संकुला साठी 1 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला तसेच आंतरराष्ट्रीय कुस्ती पटू पै राहूल आवारे याला खेळाडू कोट्यातून शासकीय नौकरी लावली असी जाहिरात सगळ्या सोशल मीडिया नेटवर्किंग साईट वर फिरत आहे.

आता पर्यंत बीड जिल्ह्य़ातील तालुक्याचा आढावा घेतला तर कुठल्याच तालुक्यात 1 कोटीच क्रीडा संकुल झालेले दिसत नाही,कमीत कमी पंकजा मुंडे यांनी सोशल मीडिया प्रमुखांना तुम्ही काय लिहीता काय पोस्ट करता याची तंबी द्याला पाहिजे कारण अगोदरच भाजप ला जुमला पार्टी म्हणून संबोधतात त्यात अश्या खोट्या दिशाभूल करणाऱ्या पोस्ट जर होत असतील तर ते अशोभनीय आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे पै राहूल आवारे याला खेळाडू कोट्यातून शासकीय नौकरी लावली हे कसे शक्य आहे तो त्या नियमात बसत नव्हता का? त्या मुळे पंकजा मुंडे याना काहि करून त्याला शासकीय नौकरी द्यावी लागली असे बरेच प्रश्न निर्माण होतात ते त्यांच्या प्रचारात प्रश्न उपस्थित होऊन अडचणीचे ठरू शकतात म्हणून या तुम्ही हारलात तर याला सोशल मीडियावर पोष्ट करणाऱ्या तुमच्या समर्थकांचा हातभार असेल हे विसरून चालणार नाही.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!