• Sat. Apr 18th, 2026

जिल्ह्यात वीज पडून चार जनावरांचा मृत्यू

Bybaba maske

Apr 18, 2024

जिल्ह्यात वीज पडून चार जनावरांचा मृत्यू

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड – बीड जिल्ह्यात आज दिवसभर तापमान जवळपास 42 डिग्री सेल्सिअस गेल्यामुळे हवेमध्ये उष्णतेची लाट पसरली होती यामध्येच दुपारी पाच नंतर अचानक विजांचा कडकडाट आणि गडगडात पाहायला मिळाला यातच बीडच्या पांढरवाडी गावात वीज पडल्याने चार जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहायला मिळत आहे यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे अचानक आलेल्या पावसाने शेतामध्ये बांधलेली जनावरे ती गोठ्यात बांधायची होती मात्र काही वेळातच अचानक वीज पडल्याने शेतकरी दिलीप उत्तम शेळके यांची दोन बैल व दोन दुभत्या गाई या मरण पावले आहेत त्यामुळे या अवकाळी पावसाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांनाही सहन करावा लागत आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!