यशवंत धाबा मालकाचा अपघाती मृत्यू; तर विजय परमिट रूम व बार मालक व एक जण जखमी
रोखठोक न्युज वार्ताहर
मोटारसायकलवरुन येरमाळा ते केज कडे येत असताना पहाटे झाला अपघात केज येथील बीड रोडवर असणारा प्रसिद्ध यशंवत धाबा मालक रामचंद्र घुले रा. टाकळी यांचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला आहे. तर केज येथील विजय बियर बारचे मालक व मसुरे अन्य एक जण जखमी झाले आहेत. विजय बियर बार चे मालक विलास रोडे यांच्या डोक्याला व चेहर्याला मार लागला आहे. त्यास पुढील उपचारासाठी अंबाजोगाई रूग्णालयात दाखल केले आहे.मसुरे नावाचा तिसऱ्या युवकाची सविस्तर माहिती भेटली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार हे तिघे युवक रात्री उशिरा येरमाळा येथे देवदर्शनासाठी गेले होते, पहाटे केज कडे येत असताना कळंब शहरात त्यांच्या मोटारसायकलीचा अपघात झाला. यात रामचंद्र घुले यांचा मृत्यू झाला आहे. अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही.
कर्तुत्वान, मनमिळाऊ स्वभाव, कुटुंबातील लाडका व एकूलता एक, भरपूर मित्रपरिवार असलेला तरूण युवक रामचंद्र घुले याच्या निधनाने टाकळी गावावर व कुटुंब व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.
