जयभीम पाहिजे का रामराम येथून सुरू झालेली लढाई मराठा ओबीसींवर आली!!!
जातीच हे छोटे रोपट आज महावृक्ष झालाय.
रोखठोक न्युज संपादक बाबासाहेब मस्के.
केज मतरसंघा ज्या वेळेस पासुन अनुसूचित जाती साठी राखीव झाला त्या दिवसापासून या मतरसंघात जयभीम पाहिजे का रामराम पाहिजे या वरच संपुर्ण निवडणूक आता पंर्यत झाली.
या मतदारसंघावर स्वर्गीय बाबुराव आडसकर यांचे वर्चस्व राहिले आणि पहिली जातीवादाची ठिणगी त्यांनीच या मतरसंघात टाकली.त्या वेळेस केज मतरसंघात बाबुराव आडसकर यांचे प्राबल्य होते.खासदार केशरकाकु क्षीरसागर,गेवराई पंडित असे मातब्बर राजकीय घराण्याची सत्ता बीड जिल्ह्य़ात होती 1985 सालच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षा कडून बौद्ध समाजचे अंनत जगतकर यांना संधी दिली त्या वेळेस बाबुराव आडसकर यांनी अनुसूचित जातीतील चांभार समाजाचे भगवान सातपुते यांना अपक्ष उमेदवारी दिली.त्यावेळेस काँग्रेसने दगड ही दिला तरी निवडून येत असे अश्या वेळेस बाबुराव आडसकर यांनी प्रचाराच्या एका भाषणात रामराम पाहिजे का जयभीम असा प्रश्न केला हि पहिली निवडणूक जातीवर झाली आणि चांभार समाजाचे भगवान सातपुते आमदार झाले.त्या नंतर आजतागायत ही निवडणूक फक्त रामराम व जयभीम याच शब्दावर होते आणि प्रत्येक वेळेस रामराम म्हणार्या आमदार निवडून येतो.
गोपीनाथराव मुंडे यांनी भगवान सातपुते यांना पराजित करण्या साठी काँग्रेस पक्षात असणारे नंदकुमार मुंदडा यांच्या पत्नी डॉक्टर विमलताई मुंदडा यांना भाजप कडून उमेदवारी दिली. विमलताई या माहेरच्या चांभार समाजाच्या पण ईकडे लग्न झाल्यावर मुंदडा झाल्या आणि त्याचा बराचसा फायदा त्या निवडून यान्या वर झाला व त्या निवडून आल्या.आज त्यांच्याच सुनबाई नमिताताई मुंदडा या विद्यामान आमदार आहेत.
या नंतर याची प्रचिती पुन्हा खुद्द बाबुराव आडसकर यांनाच आली रेणापूर मतरसंघात वंजारी समाजाचे गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात फक्त मराठा उमेदवार म्हणून बाबुराव आडसकर यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवले हि निवडणूक सुद्धा जातीवर झाली वंजारी विरोध मराठा आणि या निवडणुकीत बाबुराव आडसकर यांचा पराभव झाला.
त्यानंतर प्रत्येक निवडणूकीत जात बघून उमेदवार उतरविला जात असे त्याची सुची बीड लोकसभेच्या प्रत्येक निवडणूकीत पाहिला भेटली गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस तर कधी रमेशराव आडसकर, प्रितम मुंडे यांच्या विरोधात आशोक पाटील, बंजरग सोनवणे असे जात बघून उमेदवार उतरवले गेले.यात गोपीनाथराव मुंडे यांनी सुद्धा स्वता ओबीसीं प्रवर्गातील असताना केशर काकु क्षीरसागर यांच्या समोर काँग्रेस मधुन आयात करून मराठा असलेल्या रजनीताई पाटील यांना उमेदवारी दिली व निवडून आणले आज तीच लढाई बाबुराव आडसकर व काही प्रमाणात गोपीनाथराव मुंडे यांनी केलेली जातीची सुरूवात आज त्यांच्याच वारसदाराच्या मानगुटीवर बसली आहे.बाबुराव आडसकर यांचे वारसदार मेघराज आडसकर चौसाळा मतरसंघातुन वंजारी समाजाचे केशवराव आधंळे यांच्या कडून पराभूत झाले तर त्यांचे धाकटे चिरंजीव रमेशराव आडसकर हे माजलगाव मतरसंघातुन पराभूत झाले .माजलगाव मतरसंघात जाती पेक्षा आकरा,बारा,हा फॅक्टर जास्त काम करतो म्हणजे ती सुद्धा एक जातीयताच आहे. आणि आज बाबुराव आडसकर व गोपीनाथराव मुंडे यांनी निर्माण केलेला जात फॅक्टर आज यांच्याच मानगुटीवर बसला आहे.
आज हे जर हयात असते तर यांना कळाले असते जात आता बीड जिल्यातुन जाता जाईना!!! यांनी लावलेल हे छोट रोपट यांच्याच वारसदारांना अडचणीच ठरतय.
