• Mon. Apr 27th, 2026

दुचाकी – ट्रॉली अपघात, पती ठार पत्नी गंभीर जखमी 

Bybaba maske

May 4, 2024

दुचाकी – ट्रॉली अपघात, पती ठार पत्नी गंभीर जखमी 

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज पासून बीड कडे जाणाऱ्या राज्य रस्त्यावर काही अंतरावर असणाऱ्या टोल नाक्या नजीक दुचाकीचा अपघात झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी आहे.

    तालुक्यातील कोरेगाव येथील वसंत आप्पाराव घुले आणि त्यांच्या पत्नी राजूबाई घुले हे दोघे कोरेगाव कडे जात असताना दिनांक ४ मे रोजी सायंकाळी सात ते आठ च्या दरम्यान टोलनाक्याच्या पुढे गेल्यानंतर एका ट्रॉलीला दुचाकीची धडक लागली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले, आणि यातच वसंतराव घुले यांचा मृत्यू झाला. तर राजूबाई घुले या गंभीर जखमी झालेल्या आहेत.

         सदरील अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणाहून जाणारे अनिल सारूक यांनी थांबून दोघा अपघातग्रस्तांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यासाठी मदत केली. मात्र आप्पाराव घुले यांचा मोठा रक्तस्त्राव झाला असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या राजूबाई घुले यांना पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात आले आहे सदरील अपघात हा नेमका कसा झाला ? याबाबत अद्याप स्पष्टता झाली नाही. परंतु यामध्ये एकाला आपला प्राण गमवावा लागला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!