• Sun. Apr 19th, 2026

पोलिस निरीक्षक यांच्या घरी चोरी करताना तिघांना पकडले पोलिस निरीक्षक महाजन यांनी शिताफिने तीन चोर पकडले.

Bybaba maske

May 3, 2024

पोलिस निरीक्षक यांच्या घरी चोरी करताना तिघांना पकडले

पोलिस निरीक्षक महाजन यांनी शिताफिने तीन चोर पकडले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज : येथील ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या घरात प्रवेश करुन चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. वेळीच महाजन यांना जाग आल्याने त्यांनी. तिघांनाही जागीच पकडून केज पोलिसात गुन्हा नोंद केला.

पोनि. प्रशांत महाजन हे आपल्या कुटुंबीयांसह सोमवारी रात्री जेवण करून झोपी गेले असता मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान तीन चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरी करीत असतानाच मोठ्या शिताफीने प्रशांत महाजन यांनी तिन्ही चोरट्यांना जागीच जेरबंद करून पोलिस ठाण्यात कॉल करून जीप मागविली. पोनि. महाजन यांच्या फिर्यादीवरून हरीओम गणेश शिंदे रा. सायन, धारावी झोपडपट्टी, मुंबई, सचिन यलप्पा कोटकर, ओमकार युवराज कटके दोघेही रा. चोरमुले प्लॉट, बार्शी, बागपिंपळगाव रोड या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास एएसआय बाबासाहेब रोडे हे करीत आहेत. पोलिस निरीक्षक यांच्या घरीच चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे केज येथील साईनगर पश्चिम, विठाई पुरम, कामगारनगर, शिक्षक कॉलनी, धारूर रोड भागात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!