• Sun. Apr 19th, 2026

अंबाजोगाई येथे होणाऱ्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-शहराध्यक्ष बाबा मस्के.

Bybaba maske

May 3, 2024

अंबाजोगाई येथे होणाऱ्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-शहराध्यक्ष बाबा मस्के.

रोखठोक न्युज वार्ताहर 

वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटीलयांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे दिनांक ३ मे २०२४ रोजी ठीक सायं.५-०० वाजता मोंढा मैदान अंबाजोगाई येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी केज मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे केज शहराध्यक्ष बाबासाहेब मस्के,उत्तम वाघमारे,दत्ता व्यवहारे,सलीम तांबोळी यांनी केले आहे. बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांची उमेदवारी घोषित केल्यापासून पहिल्यांदाच ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे येत आहेत.देशाचे संविधान व लोकशाही धोक्यात आली असून देशाचे संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे अहोरात्र काम करत आहेत.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी केज मतदार संघातील सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहावे.

 

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!