• Mon. Apr 27th, 2026

सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात एकजण जागीच ठार तर १६ जखमी;तिघांची प्रकृती चिंताजनक

Bybaba maske

May 28, 2024

सोलापूर-धुळे महामार्गावर  भीषण अपघात एकजण जागीच ठार तर १६ जखमी;तिघांची प्रकृती चिंताजनक

रोखठोक न्युज वार्ताहर 

तुळजापूर येथे दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या क्रुझरला अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत एकजण ठार तर १६ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री पहाटे ३ वाजता सोलापूर-धुळे महामार्गावर घडली. जखमीतील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. इतर जखमीवर बीड येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटे ३ पासून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी जागे असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.

जितेंद्र जनार्दन सोनवणे ( वय ३० वर्ष ) असे या अपघातातील यताचे नाव आहे.जखमी रुपेश दिवाकर नेवे ( वय ४० वर्ष ), दक्ष रुपेश नेवे ( वय दीड वर्ष ), आराध्य रुपेश नेवे ( ७ वर्ष ) , मुरलीधर केशरलाल ललवाणी ( वय ४८ वर्ष ) , ललित विनोद वाणी ( वय २८ वर्ष ), लोकेश जितेंद्र सोनवणे ( वय १० वर्ष ), रुक्‍मीनबाई जनार्दन सोनवणे ( वय ६५ वर्ष ), सौरव रवींद्र वाणी ( वय १४ वर्ष ) रिंकू जितेंद्र सोनवणे ( वय ३० वर्ष ), रूपाली जितेंद्र सोनवणे ( वय ८ वर्ष ), विद्या रवींद्र वाणी ( वय १६ वर्ष ), रोशनी संतोष वाणी ( वय १० वर्ष ), नेहा गणेश वाणी ( वय १४ वर्ष ), उमेश कुंडलिक शेळके ( वय २४ वर्ष ), पल्लवी दगडू राठोड ( वय १८ वर्ष ), दगडू करू राठोड ( वय ३६ वर्ष ), शारदा रुपेश नेवे ( वय ४० वर्ष ) अशी नावे आहेत. हे बहुतांश पहूर ता. जामनेर जि. जळगाव येथील आहेत. जिल्ह्यातील असून ते क्रुजर एम.एच. १९ बी यू ४४६१ या वाहनाने तुळजापूर येथे दर्शनासाठी चालले होते. दरम्यान ते सोलापूर-धुळे महामार्गावर मांजरसुंबा जवळील मोरगाव फाटा येथे आले असता पहाटे ३ वाजता एका ट्रकने क्रुजरला धडक दिल्यामुळे अपघात घडला आहे. यामध्ये वरील एकजण ठार तर १६ ते १७ जण जखमी झाले आहेत. जखमीतील तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे नितीन धांडे यांनी सहकार्यासह धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.एकाचवेळळी अनेक जखमी आल्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी धावपळ करत, तसेच फोन करुन इतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावून घेत सर्व जखमींवर तातडीने उपचार सुरू केले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!