• Wed. Apr 29th, 2026

लाचप्रकरणी तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान सील कारवाईनंतर तहसीलदार जगताप मात्र फरार  पुरवठा नायबतहसीलदार व इतर कर्मचारी धुतल्या तांदळाचे आहेत का?

Bybaba maske

Jun 2, 2024

लाचप्रकरणी तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान सील

कारवाईनंतर तहसीलदार जगताप मात्र फरार 

पुरवठा नायबतहसीलदार व इतर कर्मचारी धुतल्या तांदळाचे आहेत का?

रोखठोक न्युज वार्ताहर 

लाचप्रकरणी कोतवाल मच्छिंद्र माने यास ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तहसीलदारांचे निवासस्थनही सील केले आहे. शिल्लक धान्यसाठा स्वस्त धान्य दुकानात आढळून न आल्याने तहसीलदारांनी दुकानाचे लायसन्स रद करण्याची धमकी दिली. प्रकरण मिटवण्यासाठी कोतवालाने ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. शेवटी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोतवालास शुक्रवारी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. कारवाईची माहिती मिळताच तहसीलदार अभिजित जगताप फरार झाले. कोतवाल मच्छिंद्र माने याच्यासह तहसीलदार अभिजित जगताप अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून माने याला अटक केली. तक्रारदाराच्या आजीच्या नावावरील स्वस्त धान्य दुकान वारसा हक्काने नावावर आहे. बुधवारी केजचे तहसीलदार अभिजित लक्ष्मण जगताप व कोतवाल मच्छिंद्र मारुती माने या दोघांनी तक्रारदाराच्या स्वस्त धान्य दुकानास भेट देत तपासणी केली होती. शासनाकडून पुरवण्यात आलेला पूर्वीचा जुना गहू व तांदळाचा शिल्लक साठा रेकॉर्डला होता. मात्र तो शिल्लक साठा दुकानात दिसून येत नसल्याने तुझ्यावर कारवाई करून तुझ्या दुकानाचा परवाना रद्द करतो असे तहसीलदार जगताप स्वस्त धान्य दुकानदारास म्हणाले. तक्रारदाराने त्यांना पूर्वीचा जुना शिल्लक धान्यसाठा वाटप केल्याचे सांगितले. त्यावर कोतवाल माने याने तुझे प्रकरण मिटवायचे असेल तर तहसीलदारांना ४० हजार रुपये द्यावे लागतील. नसता साहेब तुझे लायसन्स रद्द करतील असे सांगितले. तक्रारदार स्वस्त धान्य दुकानदाराने मी गरीब असून माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत असे म्हणत विनवणी केली. शेवटी तक्रारदाराने धाराशिक्च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने पंचासमक्ष तक्रारदाराकडे लाच मागणी केल्याची खातरजमा केली. कोतवाल माने याने ४० हजार रुपयांऐवजी २० हजार स्पयांमध्ये तडजोड केली. ३१ मे रात्री अंबाजोगाई रस्त्यावरील पिसेगाव फाट्यावरील आर्या हॉटेलवर तक्रारदाराला बोलावून घेण्यात आले. त्याच्याकडून २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना कोतवाल मच्छिंद्र माने यास पथकाने पकडले. तहसीलदार जगताप, कोतवाल मच्छिंद्र माने या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली कोतवाल मच्छिंद्र माने यास धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी अंबाजोगाई जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तहसीलदार अभिजित जगताप यांचे तहसील आवारातील शासकीय निवासस्थान सील करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली आहे.

या आगोदर ही केज तहसील पुरवठा विभागाचा अंदाधुंद कारभार रोखठोक न्युज ने बातम्या द्वारे उघड केला होता पण त्याच्या कडे कोणीच लक्ष दिले नाही.या आधी आगोदर राशन दुकानदाराला टिपी न देताच माल वाटला त्या वेळेस दुकानदारांनी माल घेण्यास नकार दिला कारण कोणत्या दुकानाला किती माल आला ते कळत नव्हते पण नायबतहसीलदार लक्ष्मण धस यांनी माल उतरून घेण्यास सांगीतले व दुसर्‍या दिवशी राशन दुकानदारांनी तहसील ला येऊन टिपी घेतल्या.तसेच प्रतेक पोत्या मागे चार पाच किलो रेशन कमी येत असल्याची दुकानदारांची तक्रार आहेत पण या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जाते.एक वेळेस इमानदारीने तहसील पुरवठा विभागाचे ऑडिट केले तर सगळेच मासे गळाला लागतील असे बोलले जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!