श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्र निधीची वितरण करा !
आज सायंकाळी ६ वाजता आमरण उपोषणाला बसणार – रोहन गंलाडे पाटील
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यात चिंचोली माळी येथील श्री संत नामदेव महाराज मंदिर तीर्थक्षेत्रासाठी ५० लाख रुपये निधी मंजूर झालेला असुन सुद्धा निधीचे वितरण केले जात नाही व मंदीराच्या विकास कामास सुरुवात केली जात नाही तरी निधीचे वितरण करुन श्री संत नामदेव महाराज तीर्थ क्षेत्राचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे यासाठी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य तालुकाध्यक्ष रोहन गलांडे पाटील दि.१७ /०६/२०२४ रोजी वेळ सायंकाळी ६ वाजता आमरण उपोषणास बसणार आहे असे रोहन गलांडे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.या विषय सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी श्री संत नामदेव महाराज मंदिर चिंचोली माळी ता.केज जि.बीड तीर्थक्षेत्रासाठी ५० लाख निधी मंजूर झालेला असुन अनेक दिवसांपासून निधीचे वितरण करण्यस विलंब होत आहे तरी तात्काळ ५० लाख निधीचे वितरण करुन विकास कामास सुरुवात नाही झाल्यास दि.१७/०६/२०२४ रोजी श्री संत नामदेव महाराज सभागृह येथे सायं ६ वाजता अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य तालुकाध्यक्ष रोहन गलांडे पाटील आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग केज, अंबाजोगाई यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे रोहन गलांडे पाटील यांनी केली आहे.
