• Fri. Apr 24th, 2026

खा.बजरंग सोनवणे आले ॲक्शन मोड वर.रेल्वे,राष्ट्रीय महामार्ग, पिककर्जाचा घेणार

Bybaba maske

Jun 16, 2024

खा.बजरंग सोनवणे आले ॲक्शन मोड वर.रेल्वे,राष्ट्रीय महामार्ग, पिककर्जाचा घेणार आढावा बैठक 

रोखठोक न्युज वार्ताहर 

खासदार बंजरग सोनवणे ॲक्शन मोड वर आले असून दि.१८ जून रोजी दिवसभर बीड- परळी रेल्वेमार्गा संबंधित बैठक लावली असून सर्व अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देण्याच्या सुचना दिल्या आहेत.

 हार तुरे आणि मिरवूणका न काढता बीड जिल्ह्यात खासदार काय कामे करू शकतात, हे दाखवून देण्यासाठी आता नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे कामाला लागले आहेत. दि.१८ जून रोजी बीडच्या रखडलेल्या रेल्वे प्रश्नाबाबत आढावा बैठक आयोजीत करण्यात आली असून याचवेळी पिककर्ज आणि रखडलेले व खराब झालेल्या महामार्गासाठी आढावा बैठक घेणार आहेत. दिवसभर मॅरोथॉन बैठक होणार आहे.

बीड जिल्ह्यात मागील काळात विकासाची कामे मार्गी लागलेली नाहीत. किती तरी वर्षांपासून रेल्वेचा प्रश्न तसाच पडून असून वर्षाकाठी रेल्वेचे काम पाच दहा किलोमिटरने पुढे सरकत आहे. यामुळे बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न अपुर्ण आहे. सदरील रेल्वेप्रश्नासाठी बीडमधील कृती समितीने जेल सुध्दा भोगलेले असून यासाठी आजवर अनेक आंदोलने झालेली आहेत. बीडला रेल्वे आली तर येथील विकासाला चालना मिळणार आहे.यासाठी खासदार झाल्यानंतर पहिली बैठक बजरंग सोनवणे यांनी रेल्वेची बैठक लावली आहे. दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अहमदनगर- बीड- परळी- रेल्वे मार्ग, जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कामांची सद्यस्थिती व कामांचा आढावा बाबत सद्यस्थितीची अद्ययावत माहिती मागविण्यात आलेली आहे. खा.सोनवणे यांनी बैठक लावल्यानंतर अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झालेली असून आता रेल्वे कामांची नेमकी वस्तूस्थिती समोर येणार आहे. तर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचाही आढावा घेण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता याच ठिकाणी जिल्हा अग्रणी बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आलेली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज देण्यासाठी ही बैठक असणार आहे. खा.सोनवणे यांना शेतकरी पुत्र म्हणून ओळखले जाते. यामुळे त्यांनी ही बैठक लावून आपण शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचे दाखवून दिले आहे.

 

चौकट…

जिल्हा परिषद कडील योजना, ‘जलजीवन’वर देणार भर

जिल्ह्यातील प्रत्येक गावात जलजीवन मिशनचे कामे सुरू आहेत. अनेक गावात कामे रखडलेली असून सदरील कामे वेळेत पुर्ण व्हावीत आणि नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. या बैठकीत ते जिल्हाभरातील आढावा घेणार आहेत.

जिल्हा परिषदेकडे असलेल्या विविध योजनांचाही ते आढावा घेत असून यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, सर्व शिक्षा अभियान, अंतर्गत तसेच जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामांची सद्यस्थिती व नियोजन संदर्भात दि.१८ रोजी दुपारी ३ वाजता बैठक घेत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!