• Fri. Apr 24th, 2026

अज्ञातांनी धारूर मध्ये बसवला छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा.  प्रशासन काय निर्णय घेणार? धारूर शिवप्रेमी ची गर्दी 

Bybaba maske

Jun 14, 2024

अज्ञातांनी धारूर मध्ये बसवला छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा. 

प्रशासन काय निर्णय घेणार? धारूर शिवप्रेमी ची गर्दी 

रोखठोक न्युज वार्ताहर 

किल्लेधारुर दि. 14 जून – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चौथऱ्यावर पहाटे अज्ञात व्यक्तीनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवल्याची घटना उघडकीस आली.किल्लेधारुर शहरातील बस स्थानकावर राष्ट्रीय महामार्ग 548 सी वर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. गेली तीस ते चाळीस वर्षांपासून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवण्याची मागणी आहे. त्यादृष्टीने येथे नगर परिषदेच्या वतीने चौथराही निर्माण करण्यात आलेला आहे. मात्र शासकीय नियमावलीच्या दप्तर दिरंगाईत अद्यापपर्यंत येथे पुतळा बसवण्यात आलेला नव्हता. मात्र आज शुक्रवार दि. 14 रोजी चौकातील चौथऱ्यावर अचानक अज्ञात व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवण्यात आला. यामुळे शहरात एकच चर्चा सुरु आहे.आता या वर धारूर नगरपरिषद काय भुमीका घेते या वर सर्व अवलंबून आहे.सध्या तरी धारूर मध्ये छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा पहाण्या साठी शिवप्रेमीची गर्दी होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!