• Fri. Apr 24th, 2026

शिक्षणाच्या आईचा घो!!केज शिक्षण विभागाच चाललय काय. सिईओ अविनाश पाठक लक्ष देतील का?

Bybaba maske

Jun 18, 2024

शिक्षणाच्या आईचा घो!!केज शिक्षण विभागाच चाललय काय.
सिईओ अविनाश पाठक लक्ष देतील का?

रोखठोका न्युज

:प्रतिनिधी:दि.१८ केज गट विभाग साधन केंद्रात सावळा गोंधळ वर्षानुवर्ष शैक्षणिक अहर्ता नसनारे कार्यालयात कार्यरत कारभारी करतात कारभार त्यामुळेच गुणवत्ता डासळली.बीड जिल्हा परिषद सिईओ अविनाश पाठक यांच्या कडून गुणवत्ता वाढीसाठी योग्य कार्यवाहीची पालक वर्गाकडून अपेक्षा.
सविस्तर वृत्त असे की केज तालुक्याती गट शिक्षणाधिकारी कार्यालयात पदासाठी ची शैक्षणिक कोणतीही अहर्ता-पात्रता नसताना चुकीच्या मार्गाचा व अर्थिक लक्ष्मीचा वापर करून,राजकीय बळावर कार्यालयाची अर्थिक चावी असलेले पद म्हणजे केंद्रीय मुख्याधापक आहे,या पदाचा कारभार घेण्यासाठी अनाधिकृत राजकीय व अर्थीक बळाचा वापर करून कोणतीही शैक्षणिक अहर्ता-पात्रता नसतानाही पदाच्या खुर्चीला गोचडा सारखे काही कर्मचारी चिटकून काही अति विद्धवान-चतूर शिक्षक वर्षानु वर्ष कार्यरत असुन प्रत्यक केंद्रात पदाच्या-ग्रेड पात्र शिक्षक असताना त्यांच्या कडे पदभार न देता. त्यांच्यावर राजकीय व अधिकारी यांचा दबान टाकून कार्यालयाशी घोडेबाजार करून गेल्या दहा वर्षा पासुन केंद्रीय मुख्याधापक पद ताब्यात घेऊन सर्व साधारण शिक्षकांना कायदाचा बडगा दाखवत विविध प्रकाराचा आवलंब करतात.केंद्रीय मुख्याधापक हे पद सांभाळणारे विद्वान चतूर शिक्षक हे याच स्थानिक तालुक्यातील असलेने ते सर्व विविध बळाचा वापर करून ते सर्वांचे सहवासातले असून त्यांचे कोणत्याही शिक्षकावर व यंत्रणेवर नियंत्रण राहिलेले दिसत नाही, हे प्रभारी राज व अनाधिकृत शिक्षकांन मुळे केज तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता कमी झालेली दिसुन येत आहे.
हे भ्रष्ट बोगस, स्वतःअधिकारी म्हणून घेत खुर्चीला चिकटून बसलेले शिक्षक यांच्या मुळे खरे ज्यांची लायकी आहे जे याच्या साठी पात्र आहेत असे केंदिय मुख्याधाप पद सेवाजेष्ठते ग्रेड नुसार नियुक्त्या देऊन तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी या गंबीर विषयाकडे केज सुपुत्र व जिल्हा परिषदेत शिक्षण सभापतिपद सांभाळणारे खासदार बजरंग(बप्पा)सोनवने या कडे गांभीर्यपूर्वक पाहून नक्कीच न्याय देतील अशीअपेक्षा केज तालुक्यातील पालक वर्ग चर्चा होत करत आहे.
चौकट
आमच्या प्रतिनिधीने केज गट शिक्षणाधिकारी,लक्ष्मण बेसकर यांच्याशी मोबाईल वरून आपल्या कार्यालयात किती केंद्रा वर असे केंद्रीय मुख्याधापकांचा अनाधिकृत पदभार दिलेले शिक्षक आहेत किंवा बाहेरचे शिक्षकांना नियुक्त्या केल्या आहेत याची माहिती घेतली असता मिळू शकली नाही.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!