• Thu. Jun 25th, 2026

स्वा.रा.ति रूगणालय परिसराती जुने निवासस्थान पाडणार! कर्मचारीवर्ग,वंचित बहुजन आघाडी आक्रमक.भर पावसाळ्यात बेघर होण्याची भीती.

Bybaba maske

Jun 22, 2024

स्वा.रा.ति रूगणालय परिसराती जुने निवासस्थान पाडणार!

कर्मचारीवर्ग,वंचित बहुजन आघाडी आक्रमक.भर पावसाळ्यात बेघर होण्याची भीती.

रोखठोक न्युज वार्ताहर 

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात व रूगणालयातील जुन्या कर्मचारी निवासस्थानाच्या इमारती पाडून त्या ठिकाणी नवीन इमारती बांधन्याचे प्रस्थावित आहेत.त्या साठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे.त्या साठी तेथे राहत असलेले कुटुंबांचे भर पावसाळ्यात डोक्या वरचे छप्पर निघणार आहे,शासकीय नियमानुसार पावसाळ्यात कुठलेही अतिक्रमण किंवा निवारा काढू शकत नाहीत असा शासनाचे निर्देश असताना गुत्तेदार व रूगणालय प्रशासनाची घाई का?साठी तेथील शासकीय कर्मचारी व हंगामी कर्मचारीवर्ग अस्वस्थ झाला असून त्यांनी रुग्णालयाचे डीन धपाटे यांना निवेदन दिले आहे की आम्हाला काही दिवसाची सवलत देण्यात यावी.पण रुग्णालयाचे डीन धपाटे यांनी त्यास नकार दिला आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद मस्के हे अक्रमक झाले असून वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरू असे ठाम पणे त्यांनी प्रशासन सांगीतले असून सर्व रूगणालयातील निवासस्थानात रहाणार्‍या कर्मचारीवर्गाला सोबत घेऊन निवेदन दिले आहे या निवेदनावर कर्मचारीवर्गाच्या स्वाक्षरी आहेत

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!