• Mon. Apr 20th, 2026

नेते मंडळीने लावला फ्यूज जनता झाली कन्फ्यूज सोशल मिडियावर मुंदडा – सोनवने समर्थकांचे स्टेटस, पोस्टांचा धुमाकूळ  मांजरा नदी वरील कामावरून श्रेयवादाची लढाई!

Bybaba maske

Jun 23, 2024

नेते मंडळीने लावला फ्यूज जनता झाली कन्फ्यूज

सोशल मिडियावर मुंदडा – सोनवने समर्थकांचे स्टेटस, पोस्टांचा धुमाकूळ 

मांजरा नदी वरील कामावरून श्रेयवादाची लढाई!

रोखठोक न्युज वार्ताहर 

लोकसभेची निवडणूक झाली आणि आता चार महिन्यांत विधानसभेच्या निवडणूकीचे बिगुल वाजेल.लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार)गटाला सोडचिठ्ठी देत आचानक शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना पराभूत करून जाँईट किल्लर ठरलेले बजरंग सोनवणे यांनी कामाचा धडाका लावला.पहिली बैठक ही त्यांनी राष्ट्रीय महामार्ग,रखडलेली रेल्वेमार्ग व पीकविमा या बाबत 18 जून रोजी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडली व त्यात अधिकारी व गुत्तेदारांना फैलावर घेऊन काम करण्याचे आदेश दिले.     पंढरपूर-पैठण पालखी मार्ग,खामगाव-पंढरपूर अहमदपूर-अहिल्यानगर. असे महामार्ग होते त्यात कंळब नदी वरील मांजरा पुल व पंढरपूर-पैठण पालखी रस्त्यावर डोंगरकिंन्ही ते पाटोदा रस्त्यावर मळेकर घाट येथील रस्त्याचे काम गेल्या 7 वर्षापासूनच रखडलेेली होती तो ही रस्ता बनवायला चालू झाला.

पाच वर्षापासुन रखडलेला केज-कळंब मार्गावरील मांजरा नदी वरील पुल हा रखडलेल्या अवस्थेत होता.सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले व नासेर सौदागर यांनी या पुला साठी अनेक अंदोलन केले पण हे काम करणाऱ्या मेघा इन्स्ट्रक्टर यांनी काही मनावर घेतल नाही पण आचानक सुत्र हालले आणि रस्ता बनवायला चालु झाले आणि श्रेयवादाची लढाई चालू झाली.आमदार नमिताताई मुंदडा व खासदार बजरंग सोनवणे यांच्या कार्यकर्त्या कडून सोशलमिडीया वर श्रेयवादा साठी पोस्ट पडण्या साठी चालू झाल्या व आमदार नमिताताई यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्रे सोशल मीडियावर पोस्ट होत आहेत.तर बजरंग सोनवणे यांनी 18 जून च्या बैठकी नंतर हे कामे  चालू झाल्याचे सोनवण समर्थक म्हणतायत सोशल मिडियावर मुंदडा – सोनवने समर्थकांचे स्टेटस, पोस्टांचा धुमाकूळ उडाला आहे  त्या मुळे जनता कन्फ्युज झाली नेमके काम कोणी चालू केले.त्यामुळेच नेत्यांनी टाकला फ्यूज जनता झाली कन्फ्यूज. अशी गत केज विधानसभेतील जनतेची झाली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!