टिच भर काम अन हात भर चर्चा
केज कळंब रस्ता दुरूस्ती ; श्रेय वादाच्या लढाईत गुत्तेदाराकडुन लोकप्रतिनीधीच्याच हातावर तुरी !
रोखठोक न्युज वार्ताहर
कालपासून ज्या कंळबच्या मांजरा पुलाची व रस्त्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर झाली आमदार नमिताताई मुंदडा व खासदार बजरंग सोनवणें यांच्या समर्थनार्थ जोरदार मिडीया युद्ध झेडले ते आज फुसका बार निघाल्याच दिसून आले.मेघा इन्फ्रास्ट्रक्चर ने लोकप्रतिनिधींना चुना लावल्याचे दिसून येत आहे. त्याचा व्हिडिओ आता रोखठोक न्युज च्या हाती लागला असून त्यात कुठलेच काम झाले नसल्याचे दिसून येत नाही.कंळब हद्दीत जुन्या भंगवत पेट्रोल पंपा जवळ डागडुजी काम केल्याचे फोटो पडले व त्यातच लोकप्रतिनिधीं स्वतः श्रेय घ्यायला चालू झाले व समर्थका मध्ये जुगलबंदी रंगली.टिच भर काम अन हात भर चर्चा अशी परिस्थीती झाली. लोकप्रतिनिधींकडून आपले समर्थक आवरणे गरजेच आहे.
