केज तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा वाऱ्यावर !
तहसील,पंचायत समिती,नगरपंचायत प्रभारी राज.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा वाऱ्यावर असुन प्रभारी कर्मचाऱ्यांवरच प्रशासना चा कारभार चालत असून केजला मागील अनेक महिन्यांपासून प्रमुख अधिकाऱ्यांची वाणवा आहे की काय?असा सवाल उपस्थित होत आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तहसील कार्यालयचे तहसीलदार,पंचायत समिती कार्यालयाचे गटविकास अधिकारी तर नगरपंचायत कार्यालयालचे मुख्याधिकारी हे कार्यालयाचे प्रमुख असतात परंतु गेले अनेक महिन्यापासून सदर कार्यालयास कार्यालयाचे प्रमुख नसल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत केजची प्रशासकीय यंत्रणा ही वाऱ्यावर असून प्रभारी यंत्रणेवर कार्यालयाचा कारभार चालत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.केज पंचायत समिती कार्यालयाचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांची बदली झाल्यापासून आंबेजोगाई येथील समृद्धी दिवाने मॅडम यांच्याकडे केज पंचायत समिती कार्यालया चा गटविकास अधिकारी पदाचा प्रभारी पदभार आहे.समृद्धी दिवाने मॕडम यांच्याकडे आंबेजोगाई व केज येथील दोनठिकाणचे दोन कार्यालयाचे चार्ज असल्यामुळे त्या पंचायत समिती कार्यालयाचे पूर्ण वेळ काम सांभाळत नाहीत त्यांना काही कामा निमित्त नागरिकांनीत्यांच्या मोबाईल दूरध्वनीवरसंपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या नागरिकांचा फोन घेत नाहीत असेही नागरिकांतून बोलले जात आहे.पंचायत समिती कार्यालयास गटविकास अधिकारी नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.केज तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय हे प्रमुख कार्यालय म्हणून ओळखले जाते येथेही तहसीलदार नाहीत. तहसीलदार अभिजीत जगताप यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधकांनी लाचेचा एक गुन्हा दाखल झाल्यापासून केज तहसील कार्यालयास तहसीलदार म्हणून अद्याप ही नेमणूक करण्यात आली नाही. धारुर येथील तहसीलदार कांबळे यांच्या कडे पदभार आहे नायब तहसीलदार लक्ष्मण धस हे जवळपास आठ ते नऊ दिवसापासून रजेवरआहेत त्यांच्याकडे महसूल-१चा व पुरवठा विभागाचा प्रभारी पदभार आहे. त्यांच्या पुरवठा विभागाच्या अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदार अभिजित जगताप व कोतवाल माने यांच्या वर गुन्हा दाखल झाला होता.त्या दिवसापासून नायब तहसीलदार लक्ष्मण धस हे रजेवर होते.ते आता हजर झाल्याचे सांगीतले जात आहे असल्यामुळे त्यांच्या पुरवठा विभागाशी निगडित असलेले रखडलेले आहेत.सद्या विद्यार्थीयांना रहिवाशी,डोमीसाईल, नॅशनलीटी,उत्पन्नाचे प्रमाणपत्र गरज असल्याने.विद्याथ्यांची ससेहोलपट होत आहे.सह श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजने सहविविध कामे व पुरवठा विभागाचे कामे खोळंबली आहेत. सध्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्षासाठी ऍडमिशन घेण्याकरिता विविध प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.परंतु नायब तहसीलदार धस रजेवर असल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयात विविध कामासाठी चकरा माराव्या लागत आहेत.तसेच खासरा नक्कल, फेरफारची नक्कल, राष्ट्रीयत्वाची नक्कल,क पत्रक,जुन्या सातबाराची नक्कल यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे अंदाजे दहा ते वीस रुपये प्रमाणे फिस घ्यायला पाहिजे व त्याची पावती नियमानुसार घ्यायला पाहिजे परंतु सदर पावती दिली जात नाही व सदर नक्कले साठी तहसील कार्यालयात शंभर रुपये घेतले जात आहेत व त्याची पावतीही दिली जात नाही असे नागरिकां तून दबक्या आवाजात बोलले जात आहे.केज नगरपंचायत कार्यालयात प्रभारी यंत्रणेवरच कार्यालयाचा कारभार चालत असून केज शहरा तील अनेक नागरिकांची कामे खोळंबली आहेत.केज शहरात 76 कोटीचे कामे चालू आहेत मुख्याधीकारी नसल्याने कामे बोगस होत आहेत. शहरातील नाल्या कचर्याने तुडूंब भरल्या आहेत पावसाळ्यात नालीतून कचरा काढणे गरजेच आहे.पण असे होताना दिसत नाही. केजला अनेक वर्षापासून प्रमुख अधिकाऱ्यांची वानवा आहे महत्वाच्या तहसील,पंचायत समिती,नगरपंचायत कार्यालयाचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यावर चालत असल्यामुळे याचा नाहक त्रास लाभार्थी व नागरिकांना सहन करावा लागत आहे.नागरिकांना शुल्लक कामासाठी कार्यालयात अनेक चकरा माराव्या लागत आहे तरी देखील नागरिकांचे काम मार्गी लागत नाही.तरी शासनाने संबंधित कार्यालयाला कायम स्वरुपी पदसिद्धअधिकारी नियुक्त करावेत अशी मागणी नागरीक करीत आहेत.
