• Sun. Apr 19th, 2026

केज विधानसभा निवडणूक लढवणार- रमेश गालफाडे

Bybaba maske

Jun 24, 2024

केज विधानसभा निवडणूक लढवणार- रमेश गालफाडे

रोखठोक न्युज वार्ताहर 

सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील निष्क्रिय नेत्यांमुळे मतदार संघाचा विकास थांबला आहे. रस्ते,पाणी,वीज यासारखे मूलभूत प्रश्नदेखील आतापर्यंत सोडवले गेले नाहीत.आता संघर्षाशिवाय पर्याय नाही.त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत,अशी माहिती बहुजन विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी ‘माध्यमाशी’ बोलताना दिली.

एकाच घरात केज मतदार संघाचे राजकारण गेल्या काही वर्षांपासून फिरत आहेत.त्यामुळे केज-अंबाजोगाई मतदार संघाचे वाटोळे झाले असून दलित व इतर समाजाच्या सर्वांगिण विकासाचा विचारच केला जात नाही,ही मोठी शोकांतिका आहे.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा भूलथापा देवून आणि पदर पसरुन मतांचा जोगवा मागितला जाणार आहे. त्यामुळे माझ्या बांधवांनी व मातामाऊलीनी अशा भूलथापांना बळी न पडता आपल्या हाकेला ओ देणार्‍याशी पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.म्हणून मी रमेश गालफाडे केज विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

बीड जिल्हा हा दुष्काळी आणि ऊसतोड मजूरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. रोजगारा अभावी येथील तरुणांचे मोठ्या प्रमाणात पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी मोठ्या संखेने स्थालांत्तर होत आहे.हे दुष्ट चक्र वर्षानुवर्षे चालत आहे.मात्र विकासाच्या गप्पा मारणारे आणि घराणेशाहीचे वर्चस्व स्थापन करणारे मतदार संघातील नेते यावर बोलायला तयार नसून त्यांना गोरगरिबांच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही.केवळ त्यांना त्यांच्या घरातच सत्ता कशी राहिल,यासाठी ते प्रयत्नशील असतात.निवडणुका आल्या की प्रत्येक समाजाचा झोला पांघरुन मतांचा जोगवा मागितला जातो आणि सर्व समाजही त्यांच्या नौटंकीला बळी पडतो.आपल्या केज मतदारसंघाचे व सर्व समाजाचे आजवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आपले भविष्य उज्वल करायचे असेल आणि मतदार संघाचा विकास साधायचा असेल तर हीच नामी संधी असून आपल्याला परिवर्तन घडवून आणावे लागणार आहे.असे बहुजन विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी म्हटले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!