• Sun. May 24th, 2026

केज नगर पंचायत हद्‌दीतील वार्ड क्रमांक 16 मध्ये घाणीचे साम्राज्य. काँग्रेस शहराध्यक्ष ताहेर खुरेशी यांचा आमरण उपोषणचा इशारा. नगरपंचायत वर काँग्रेस-जनविकास युतीची सत्ता. 

Bybaba maske

Jun 29, 2024

केज नगर पंचायत हद्‌दीतील वार्ड क्रमांक 16 मध्ये घाणीचे साम्राज्य.

काँग्रेस शहराध्यक्ष ताहेर खुरेशी यांचा आमरण उपोषणचा इशारा.

नगरपंचायत वर काँग्रेस-जनविकास युतीची सत्ता. 

  रोखठोक न्युज वार्ताहर 

 वार्ड क्रमांक 16 मध्ये घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले असून त्या कडे नगरपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.

वार्ड क्रमांक 16 मध्ये नालीतून कचरा काढला नसल्यामुळे नाल्या तुबल्या आहेत त्यामुळे नाल्यात कचरा अडकून पाणी साचले आहे.त्यामुळे डेंगू ,चिकणगुण्याच्या रूग्णात वाढ झाली असून अर्ध्या पेक्षा नागरिक चिकनगुण्या अजाराने त्रस्त आहेत.हे फक्त वार्ड क्रमांक 16 च नाहीतर पुर्ण केज शहरात हीच परिस्थिती आहे.प्रत्येक वार्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.नगरपंचायत ने कुठलेच पावसाळी कामे केली नाहीत.गल्ली बोळात रस्ते नाहीत.गेल्या आडिच वर्षांपासून काँग्रेस- जनविकास आघाडी ची सत्ता नगरपंचायत वर आहे पण निष्फळ,टक्केवारीत मश्गुल असलेल हे सत्ताधारी यांचे शहरा कडे दुर्लक्ष झाले आहे जे सत्तेत आहे त्याच पक्षाच्या काँग्रेस शहराध्यक्ष ताहेर खुरेशी यांना नगरपंचायत च्या विरोधात उपोषणाला बसावे लागत असेल तर नगरपंचायत गेल्या अडीच वर्षांत काय काम केले हे शहरातील सुज्ञ नागरिकांना सागावे लागत नाही.

शहराध्यक्ष ताहेर खुरेशी यांनी 2/7/2024 पंर्यत नगरपंचायत ने वार्ड क्रमांक 16 मधील नाली,पाण्याची पाईपलाईन,विहीरीत घाण पाणी जाऊन साचले आहे ते स्वच्छ नाही केले तर 2 तारखे पासुन नगरपंचायत समोर आमरण उपोषणास बसतील असा इशाराच दिला आहे.सत्ताधारी पक्षाच्या शहराध्यक्ष नेच अंदोलन करणार म्हणल्यावर नगरपंचायत काय भुमीका घेते हे बघने अवचित्याचे ठरेल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!