• Wed. Apr 29th, 2026

शिंदे गट जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक व पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी.५ एप्रिल २०२४ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात २९ जून २०२४ रोजी अटक ??

Bybaba maske

Jun 29, 2024

शिंदे गट जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक व पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी.

५ एप्रिल २०२४ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात २९ जून २०२४ रोजी अटक ??

रोखठोक न्यूज वार्ताहर 

शिंदे गट जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक व पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे कथित ऑडिओ क्लिप नंतर जामखेड येथून ताब्यात घेतले व त्या नंतर शिवसेना शिंदे गट यांनी त्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली.

आपल्याच पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेला बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तीन महिने जुन्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे कुंडलिक खांडेला अटक केले होते. पंकजा मुंडेंचा राजकीय विश्वासघात, धनंजय मुंडेंची गाडी फोडण्याचा कट आणि मनोज जरांगे यांच्याबद्दल एकेरी वक्तव्याच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे वादग्रस्त ठरलेला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेवर कायद्याचा फास आता आवळला जात आहे. 

शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर तीन महिन्यापूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आरोपी होता. मात्र सत्ताधारी पक्षाचा जिल्हाप्रमुख असल्याने असेल कदाचित, पण पोलिसांनी कुंडलिक खांडेला अटक केले नव्हते. दोन दिवसापूर्वी कुंडलिक खांडेच्या कथित ऑडिओक्लिप समोर आल्या आणि यामुळे सारेच राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्या ऑडिओ क्लिप च्या प्रकरणात खांडे विरुद्ध दोन गुन्हे यामुळे सारेच राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्या ऑडिओ क्लिप च्या प्रकरणात खांडे विरुद्ध दोन गुन्हे देखील दाखल झाले आहेत. मात्र ऑडिओ क्लिप प्रकरनंतर पोलीस अचानक सक्रिय झाले असून ५ एप्रिल २०२४ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात २९ जून २०२४ रोजी अटक ??

मे व जून महिन्यात भाजप उमेदवाराच्या प्रचारात सक्रीयअसणाऱ्या  पालकमंत्र्याच्या गाडीत असलेल्या गुन्हेगाराला आजपर्यंत अटक का केली नाही?

कथीत ॲाडियो क्लिप व्हायरल झाल्यामुळेच खांडेंना अटक? आजवर गुन्हेगाराला आश्रय कोणी दिला. तीन महिन्यापूर्वी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ज्ञानेश्वर खांडेंवरील प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे जामखेड येथून कुंडलिक खांडेच्या मुसक्या बांधल्या. त्याला सकाळी बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी शनिवारी दुपारी खांडेला बीडच्या न्यायालयात हजर केले. तसेच तपासासाठी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपीचे वकील बी डी कोल्हे यांनी सदर अटकच अवैध असल्याचा जोरदार दावा न्यायालयासमोर केला.मात्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुसरे न्या. एस. टी.सहारे यांच्या न्यायालयाने खांडेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे आता कुंडलिक खांडेच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!