माजी आमदारा भिमराव धोंडे यांना १ कोटीची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक. अश्लील चित्रफीत व्हायरल करायची धमकी.
विधानसभा निवडणुका आल्या की माझ्या चारित्र्यहननचा प्रयत्न – माजी आ.भीमराव धोंडे
खराच तसला व्हिडीओ होता का?
रोखठोक न्युज वार्ताहर
नगर : अश्लील चित्रफीत प्रसारित करून राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन आष्टीचे (बीड) माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून नगर शहरातील कोतवाली पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तथाकथित पत्रकार व एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेत माजी आमदार धोंडे यांच्या स्वीय सहायकाने तथाकथित पत्रकाराला २५ हजार रुपये दिलेही आहेत. या संदर्भात इस्माईल दर्यानी ऊर्फ भैया बॉक्सर, कल्पना सुधीर गायकवाड यांना अटक करण्यात आली.
पण खराच असा अश्लील चित्रफीत होती का?आमदार यांनी सरळ सांगायचे कोणती चित्रफीत आहे ती प्रसारित कर. “कर नाही त्याला डर कसले” ब्लॅकमेलिंग करणाऱ्या सोबत वाटाघाटी का केल्या.खराच असा अश्लील चित्रफीत होती का? हा अनुत्तरित प्रश्न रहातो?
विधानसभा निवडणुका आल्या की माझ्या चारित्र्यहननचा प्रयत्न – माजी आ.भीमराव धोंडे
विधानसभा निवडणुका जवळ आल्या की माझ्या राजकीय विरोधकांकडून माझ्या चारित्र्यहननचा प्रयत्न केला जातो कारण माझे राजकीय अस्तित्व संपले पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचे कटकारस्थान करून माझे मानसिक मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केला जातो असे माजी आ.भीमराव धोंडे यांनी कालच्या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगीतले.
याबाबत अधिक माहिती देताना माजी आ.धोंडे यांनी सांगितले की,अहमदनगर येथील तथाकथित पत्रकार व दोन महिलांनी माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे खोटे आरोप करून तुमच्या आमच्याकडे क्लिप आहेत.त्या आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करून तुमचे राजकीय अस्तित्व संपवून टाकू अशी वारंवार धमकी देऊन पैशाची मागणी करत होते.प्रारंभी ही महिला मला वारंवार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन व मेसेज करून ब्लॅक मेलींगची भाषा वापरत होती.
याबाबत चार महिन्यापूर्वी आष्टी पोलीस ठाण्यात या महिलेच्या विरोधात तक्रार दिली होती.आष्टी पोलिसांनी या महिलेला आष्टी येथे बोलावून जबाब घेतला त्यानंतर मला फोन येणे बंद झाले परंतु लोकसभा निवडणूक काळात मला परत मेसेज व फोन यायला सुरुवात झाली तसेच अहमदनगर येथील एका युट्युबचा पत्रकार व या महिलेने संगनमत करून मला एक कोटी रुपयाची मागणी केली. पैसे द्या अन्यथा आपल्या विरोधात अत्याचाराची तक्रार करून आपले राजकीय जीवन उध्वस्त करु असे सांगितले. त्यावेळी माझे स्वीय सहाय्यक जफर शेख यांनी पत्रकाराची भेट घेऊन २५ हजार रुपये दिले.तरीही त्या दोघांकडून एक कोटी रुपयांची मागणी केली जात होती.त्यामुळे मी अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात या महिला व पत्रकार विरोधात तक्रार दिली.अहमदनगर पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून एक महिला फरार आहे. माझे राजकीय विरोधक काही लोकांना पुढे करून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझे राजकीय खच्चीकरण करण्याच्या दृष्टीने चारित्र्यहननाचा प्रयत्न करतात.यापूर्वी २०१४ मध्येही असेच आरोप माझ्यावर झाले होते. २०१९ मध्येसुद्धा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय विरोधकांनी काही लोकांना पुढे करून माझे राजकीय करिअर संपविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु असल्या कोणत्याही गोष्टींना न घाबरता माझे राजकीय व सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहे.सर्व ताकदीने राजकारणात सक्रिय राहणार आहे असेही माजी आ. भीमराव धोंडे यांनी शेवटी सांगितले.
