परळी हत्याकांड! सरपंच बापु आंधळेंची हत्या; पिस्टल, कोयते जप्त
पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल.
मुख्य आरोपीस मदत करणाऱ्यांना केज,धारूर, अंबाजोगाई येथून अटक.
रोखठोक न्युज वार्ताहर
परळी शहरातील बँक कॉलनीत बोलावून घेऊन पैशाच्या कारणावरून मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळी झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली होती. या प्रकरणात पाचजणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात वापरण्यात आलेला गावठी कट्टा व कोयते जप्त करण्यात आले आहेत.
मुख्य आरोपींना मदत केल्याच्या संशयावरून केज व धारूर पोलिसांनी रविवारी आसाराम दत्ता गव्हाणे (वय २३, रा. वाघोली, ता. धारूर), मयूर सुरेशराव कदम (वय २९, रा. केज), रजतकुमार राजेसाहेब जेधे (वय २७, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई), अनिल बालाजी सोनटक्के (वय २३, रा. धारूर) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांना परळी शहर पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी सोमवारी दिली अजूनही मुख्य आरोपी असलेले शरव पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबन गित्ते, मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, वाघबेट, महादेव उद्धव गित्ते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे हे मोकाटच आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके नेमण्यात आली आहेत
