धनगर आरक्षणा साठी तरुणाने घेतला गळफास.
या आगोदर दिला होता आत्मदहनाचा इशारा.
रोखठोक न्युज वार्ताहर
धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी केज तालुक्यातील केकत सारणी येथील युवक अजय वैजनाथ शिंदे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असुन त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे आती तात्काळ कक्षात उपचार चालु आहेत.मागील महिण्यातच केकतसारणी येथील युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढुन आंदोलन करुन आत्मदहनाचा ईशारा दिलेला होता.उप विभागीय अधिकारी यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेतले होते.त्यानंतर ही या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान सदरील युवक सध्या मृत्युशी झुंज देत आहे.
