• Wed. Apr 29th, 2026

प्रेम बनावट नावाने केले जात खोटी सांगीतली चक्क पोलीस ठाण्यात खोटी जात सांगून फिर्याद दिली.  अजब प्रेम की गजब कहाणी. जवळगाव स्फोट प्रकरणात नवीन ट्विस्ट; फिर्यादीवरच फसवणुकीचा गुन्हा

Bybaba maske

Jul 12, 2024

प्रेम बनावट नावाने केले जात खोटी सांगीतली चक्क पोलीस ठाण्यात खोटी जात सांगून फिर्याद दिली. 

अजब प्रेम की गजब कहाणी.

जवळगाव स्फोट प्रकरणात नवीन ट्विस्ट; फिर्यादीवरच फसवणुकीचा गुन्हा

रोखठोक न्युज वार्ताहर 

विहिरी खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटीनचा स्फोट करून चक्क पान टपरी उडवून देण्यात आल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे तीन महिन्यापूर्वी घडली होती. अनैतिक प्रकरणातून हा स्फोट घडविण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सदरील पानटपरी चालकाच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून यातील फिर्यादी हा स्वतःची मूळ ओळख लपवून बनावट नावाने आणि जात बदलून बेमालूमपणे जवळगावात राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा देखील नोंदवला आहे.

अशोक सुभाष भालेराव याने स्फोट प्रकरणात फिर्याद दिली होती. त्यानुसार चौघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न आणि स्फोटके अधिनियमान्वये बर्दापूर पोलिसात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्हयाचा तपास करत असताना तपासात यातील फिर्यादी अशोक सुभाष भालेराव यांचे मुळ नाव योगेश सुभाष काळे (रा. शिंदाळा, ता. औसा, जि,. लातुर) असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी शिंदाळा येथे जावून माहिती घेतली असता त्याची आई सुभद्रा सुभाष काळे व भाऊ हनुमंत सुभाष काळे यांची ओळख पटली आणि त्यांची जात लिंगायत असल्याचे निष्पन झाले. सदर माहितीच्या आधारे

 पोलिसांनी अशोकला पोलिसीखाक्या दाखवताच त्याने त्याचे मूळ नाव योगेश सुभाष काळे असून लिंगायत जात असल्याचे सांगितले. २००५ साली त्याचे वैशाली सोबत ओळख होऊन प्रेमसबंध जुळले होते. त्यांनी २००८ साली लग्न केले आणि त्यानंतर तो नाव बदलून आणि मातंग समाजाचा असल्याचे सांगून जवळगाव येथे राहू लागला. मातंग जात बदलेले जातीचे प्रमाणपत्र त्याचे जवळ नाही, तसेच त्याने नाव बदलताना कोणतेही गॅझेट करुन घेतले नसून न्यायालयात अॅफिडेव्हिट न करता कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तरीसुद्धा खोटी माहिती देऊन त्याने आधार कार्ड, पण कार्ड, आयुष्यमान कार्ड, मतदान कार्ड काढून बँकेत खाते देखील काढल्याचे तपात उघड झाल्याने पोलीस उपनिरिक्षक प्रमोद यादव यांनी अशोकच्या विरोधात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून अशोक उर्फ सुभाष याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार चेवले करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!