• Thu. Jun 25th, 2026

जिलेटीनचा स्फोट; बालकामगाराचा डोळा गेला, अंगठाही तुटला

Bybaba maske

Jul 11, 2024

जिलेटीनचा स्फोट; बालकामगाराचा डोळा गेला, अंगठाही तुटला

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज: दहावीच्या वर्गातील मुलाला जिलेटीन स्फोट घेणाऱ्या ट्रॅक्टरवर कामावर ठेवले. नंतर कांड्या रोवताना अचानक स्फोट झाला आणि यात मुलाचा एक डोळा निकामी होऊन अंगठाही तुटला. शिवाय शरीराच्या विविध भागावर गंभीर जखमाही झाल्या. या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी म्हणून आईने केज पोलिस ठाण्यात खेट्या मारल्या, परंतु, गुन्हा दाखल झाला नाही. अखेर आठवड्यापूर्वी दिव्यांग प्रमाणपत्र काढायला आल्यावर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर आता तीन महिन्यांनी तिघांविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गोकुळ शेषेराव ढाकणे (वय ३२), शेषेराव ढाकणे (वय ६१, दोघेही रा. सारोळा पाटी, ता. केज) आणि शिवाजी ठोंबरे (वय ३५, रा. वडमाउली दहिफळ, ता. केज) अशी आरोपींची नावे आहेत. आनंद विकास हालकडे (वय १५, रा. विडा, ता. केज) हा १० वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. परिस्थिती गरिबीची असल्याचा फायदा घेऊन गोकुळ ढाकणे याने त्याला जिलेटीन स्फोट करणाऱ्या ट्रॅक्टरवर कामाला ठेवले. ९ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास काम करताना विहिरीमध्ये अचानक स्फोट झाला आणि यात आनंद गंभीर जखमी झाला. त्याचा डाव हात कोपरातून आखडला, एक डोळा कायमचा निकामी झाला, तर दुसऱ्या डोळ्यानेही स्पष्ट दिसत नाही. उजव्या हाताचा अंगठा तुटला, पोटावर, हातावर, तोंडावर, छातीवर गंभीर जखमा झाल्या. त्याला आगोदर बीड आणि नंतर जालना येथील

रुग्णालयात दाखल केले. उपचार घेऊन परतल्यावर आनंदची आई पार्वती हालकडे यांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून केज पोलिस ठाण्यात खेट्या मारल्या. परंतु पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत या महिलेला परत पाठविले. वारंवार असेच होत असल्याने पार्वती यांनी नंतर पोलिस ठाण्यात जाणेच बंद केले. ३ जुलै रोजी पार्वती या आनंदला घेऊन जिल्हा रुग्णालयात आल्या. दिव्यांग प्रमाणपत्र काढत असतानाच ही माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांना समजली. त्यांनी सर्व माहिती घेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि हे प्रकरण महिला व बाल कल्याण समितीकडे पाठविले. तेथून मग कारवाईला वेग आला आणि आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

केज तालुक्यातील प्रकार : दिव्यांग प्रमाणपत्र काढायला आल्यावर प्रकरण चव्हाट्यावर बाल कल्यान समितीकडून दखल

तत्त्वशील कांबळे यांनी आनंदला बाल कल्याण समितीपुढे हजर केले. त्यानंतर बाल कल्याण समिती अध्यक्ष अशोक तांगडे, सदस्य सुरेश राजहंस, संतोष वारे, छाया गडगे यांच्या कमिटीने मुलाची परिस्थिती पाहून आणि आईचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर केज पोलिसांना पत्र देत गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर केज पोलिसांना जाग आली आणि गुन्हा दाखल केला.

पार्वती या आनंदला घेऊन जिल्हा रुग्णालयात आल्या. दिव्यांग प्रमाणपत्र काढत असतानाच ही माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांना समजली. त्यांनी सर्व माहिती घेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि हे प्रकरण महिला व बाल कल्याण समितीकडे पाठविले. तेथून मग कारवाईला वेग आला आणि आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

baba maske

Related Post

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!