• Sun. Apr 19th, 2026

नगराध्यक्ष बनसोड यांना न्याय म्हणजे तो फिर्यादीवर अन्यायच. खोटी नोटरी बगलबच्याच्या नावे करून पद वाचवले. सर्व केजच्या जनतेला माहीत घर कोणाचे,अपिलात जाणार:कपिल मस्के 

Bybaba maske

Jul 28, 2024

नगराध्यक्ष बनसोड यांना न्याय म्हणजे तो फिर्यादीवर अन्यायच.

खोटी नोटरी बगलबच्याच्या नावे करून पद वाचवले.

सर्व केजच्या जनतेला माहीत घर कोणाचे,अपिलात जाणार:कपिल मस्के 

दत्तात्रय हंडिबाग यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केजच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोडे यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाला दिलासा असून विनापरवाना बांधकाम केल्या प्रकरणाचा माजी नगरसेवक कपिल मस्के यांचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी नामंजूर केला आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई प्रदीप बनसोड या संवैधानिक पदावर म्हणजेच नगराध्यक्षा पदा वर राहून त्यांनी केज शहरातील महात्मा फुले नगर येथील त्यांच्या मालकीचे घर नं.३१३१ या घराचा बांधकाम परवाना न घेताच सौ. सीताताई बनसोड या बांधकाम करीतआहेत.सौ.सिताताई प्रदीप बनसोडे यांना अनधिकृत बांधकाम केल्यामुळे महाराष्ट्र नगर परिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम१९६५ चे कलम ४४,४४(ई) नुसार अपात्र घोषित करण्यात यावे.या साठी अपिल दाखल केले होते.नगराध्यक्ष सिता बनसोड या चुकीचे विनापरवानगी घर बांधकाम करत आहेत असे समजताच माजी नगरसेवक कपिल मस्के यांनी पुरावे गोळा करण्याचे काम चालू केले याची चाहूल लागताच नगराध्यक्षांनी ते घर दत्तात्रय हंडिबाग यांना नोटरी करून दिले व ते मी केंव्हाच दत्तात्रय हंडिबाग यांना विकले असे दाखवण्यात आले.आता दत्तात्रय हंडिबाग हे कोण हे सगळा तालुका ओळखतो तसेच 

जे वर्तमान पत्र कधी तरी छापले जाते अश्या वर्तमान पत्रात त्याचे प्रकटन केले जे की कुणाच्या लक्षात येऊ नये.त्यानंतर अपिल केल्या नंतर खोटी नोटरी,वर्तमानपत्रातील प्रकटन अश्या चुकीच्या गोष्टी मुळे निकाल हा नगराध्यक्षाच्या बाजूने लागला.पण मी जी लढाई लढत होतो त्यात नैतिकी माझा विजय झाला आहे.कारण ज्या वार्डाच त्या प्रतिनिधित्व करतात त्यांना व केज शहरातील प्रत्येक नागरिकास माहीत आहे ते घर कोणाचे आहे. त्या मुळे न्याय वगैरे काही झाली नसून जिल्हाधिकारी यांची दिशाभूल केली गेली आहे.तसेच आपल्या नगराध्यक्ष पदाचा पुरेपूर गैरवापर केल्याचे मी पुरावे घेऊन मी पुन्हा आपिलात जाणार किंवा वेळ प्रसंगी न्यायालयात जाणार असे कपिल मस्के म्हणाले.तसेच दत्तात्रय हंडिबाग यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणार.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!