• Sat. Apr 18th, 2026

निवडणूक निधीवरून बहुजन समाज पक्षात संघर्ष,दलित,बंजारा मते खाण्या साठी बीएसपी उमेदवारास शिंदेगटाने प्रचारासाठी 50लाख रूपय दिले. आता कळतय दलितांच्या पक्षाकडून उमेदवारी का घेतली जाते. हरिभाऊ राठोड सह प्रमुख पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी.

Bybaba maske

Jul 29, 2024

निवडणूक निधीवरून बहुजन समाज पक्षात संघर्ष,दलित,बंजारा मते खाण्या साठी बीएसपी उमेदवारास शिंदेगटाने प्रचारासाठी 50लाख रूपय दिले.

आता कळतय दलितांच्या पक्षाकडून उमेदवारी का घेतली जाते.

हरिभाऊ राठोड सह प्रमुख पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पैशांवरून बहुजन समाज पक्षात (बसप) संघर्ष निर्माण झाला आहे. पक्षाला मिळालेला निधी काही जणांनी परस्पर हडप केल्याची तक्रार येताच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या चौकशीनंतर काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

‘बसप’ने या लोकसभेला राज्यातील ४८ पैकी ४७ जागा लढविल्या होत्या. वाशिम – यवतमाळ मतदारसंघात ‘बसप’कडून बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड उमेदवार होते. येथे शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील आणि उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्यात थेट लढत होती. राजश्री पाटील या मतदारसंघाबाहेरच्या असल्याने त्यांना येथे निवडणूक अडचणीची झाली होती. या निवडणुकीदरम्यान ‘बसप’ उमेदवाराला एका पक्षाकडून ५० लाख रुपयांची मदत करण्यात आली. पण ती मदत ‘बसप’च्या तत्कालीन उपाध्यक्षाने राठोड यांच्यापर्यंत पोहचवलीच नाही. राठोड यांनी निवडणूक संपल्यावर त्यासंदर्भात लेखी तक्रार ‘बसप’ प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोणारे यांच्याकडे केली. शिवसेना शिंदे गटाकडून ही मदत देण्यात आली होती, असे बसपच्या उमेदवाराचे म्हणणे आहे.

‘बसप’ची राज्य कार्यकारणीची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये ५० लाखांच्या निधीची चर्चा झाली. या प्रकरणानंतर ‘बसप’चे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष यांच्यासह अनेकांचे राजीमाने घेण्यात आले आहेत. तसेच पैसे पोहचले नसल्याची ज्यांनी तक्रार केली, त्या हरिभाऊ राठोड यांनीसुद्धा ‘बसप’ सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

पक्षाचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यात दोषी आढळलेल्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तसेच प्रदेश पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे.

– रामजी गौतम, ‘बसप’ राज्य प्रभारी व माजी खासदार

वाशिम- यवतमाळच्या ‘बसप’ उमेदवाराला निवडणूक प्रचारासाठी आमच्या पक्षाने पैसे पुरवल्याचा आरोप साफ चुकीचा आहे. ‘बसप’ हा महायुतीचा विरोधी पक्ष आहे, त्यांना आम्ही निवडणूक निधी पुरवण्याचा प्रश्नच येत नाही.

– संजय शिरसाट, आमदार, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते

baba maske

Related Post

केज तहसीलदारांचा अपघात की घात? गूढ कायम तपासाकडे लक्ष • राकेश गिड्ढे बुधवारी रेणापूर हद्दीत रात्री मुक्कामानंतर पहाटे निघाले होते लातूरकडे
केज नगरपंचायत घरकूल घोटाळ ठेकेदारांकडून कोट्यवधींची वसुली; मिलिंद सावंत, नीता अंधारेसह अधिकाऱ्यांवर फौजदारीची टांगती तलवार! चार कोटींच्या नियमबाह्य वितरणाचा भंडाफोड; चौकशी समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात
परळीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला नगरसेवकासह दोन मुलगे गंभीर जखमी; बीड जिल्ह्यात खळबळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!