• Fri. Sep 11th, 2026

मनोज जरांगे-पाटील यांची डॉक्टर अशोक थोरात व हारून इनामदार यांनी घेतली भेट. डाॅ.आशोक थोरात, हारून इनामदार माजलगाव मतरसंघातुन इच्छुक?

Bybaba maske

Aug 24, 2024

मनोज जरांगे-पाटील यांची डॉक्टर अशोक थोरात व हारून इनामदार यांनी घेतली भेट.

डाॅ.आशोक थोरात, हारून इनामदार माजलगाव मतरसंघातुन इच्छुक?

रोखठोक न्युज वार्ताहर 

विधानसभे साठी मनोज जरांगे-पाटील उमेदवार देणार ज्यांना कुणाला विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी अंतवली सराटी येथे भेटावे व अपला अर्ज(फाॅर्म)सादर करावा असे सांगीतल्या पासुन इच्छुकांची गर्दी अंतरवलीत वाढल्याच दिसत आहे.अशातच माजलगाव मतरसंघातुन इच्छुक असलेले डॉक्टर आशोक थोरात यांनी काल मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली त्यांच्या बरोबरच केजचे हारून इनामदार यांनीही माजलगाव मतरसंघातुन निवडणूक लढवण्याची तयारी दिसून येत आहे कारण त्यांनी ही काल मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन आपला अर्ज दाखल केल्याचे बोलले जात आहे, तसेच डॉक्टर आशोक थोरात व हारून इनामदार या दोघांनी सोबत भेट घेतल्याने वेगळेच काही राजकीय समीकरण आहे का हे पहावे लागेल.या दोघा पैकी माजलगाव मतरसंघातुन कोण लढवणार हे पाहणे सुद्धा गरजेच असेल.

गेल्या आडिच वर्षांपासून नगरपंचायत केज मध्ये रमेशराव आडसकर गटाच्या कुबड्या घेऊन सत्तेचे फळे चाकणारे हारून इनामदार आज त्यांच्याच विरोधात माजलगाव मतरसंघातुन तयारी करत असल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.

तरी आता डॉक्टर आशोक थोरात व हारून इनामदार यांच्या मुळे रमेश आडसकर व जयसिंग सोंळके यांची डोके दुखी वाढू शकते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!