• Thu. Jun 25th, 2026

दोन लाखांचे दागिने बसमधून पळविले भावाला राखी बांधून आपल्या गावी परत जाणाऱ्या बहिणीचे दागिने पळविले.

Bybaba maske

Aug 24, 2024

दोन लाखांचे दागिने बसमधून पळविले

भावाला राखी बांधून आपल्या गावी परत जाणाऱ्या बहिणीचे दागिने पळविले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज : भावाला राखी बांधून आपल्या गावी परत जाणाऱ्या महिलेच्या पिशवीतील ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवलेले दोन लाखांचे दागिने दोन महिलांनी पळविले. ही घटना केज-कळंब बसमध्ये मंगळवारी दुपारी घडली. संशयित अनोळखी दोन महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. कळंब तालुक्यातील खंडेश्वरी मस्सा येथील स्वाती सुहास नखाते या राखी पौर्णिमेनिमित्त धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथे भावाला राखी बांधण्यासाठी गेल्या होत्या. पुन्हा गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये गेल्या असता केज-कळंब बसमध्ये त्यांच्या पिशवीतील ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवलेले सोन्याचे पट्टी गंठण, मिनी गंठण, झुंबर जोड आणि २ अंगठ्या असा एकूण दोन लाख रुपयांचे दागिने चोरले. ही बाब लक्षात आल्यानंतर स्वाती  नखाते यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. केज बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित महिला दिसत असल्याची माहिती तपासी आमदार त्रिंबक सोपणे यांनी दिली.

baba maske

Related Post

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!