अत्याचारी नराधमांना बंदुकीने गोळ्या घालून जागीच ठार करा: रोहन गलांडे पाटील.
रोखठोक न्युज प्रतीनिधी
केज तालुक्यातु बदलापुर येथील झालेल्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच कोलकत्ता येथील हाॅस्पीटलमध्ये डॉक्टर वर झालेल्या अत्याचार व अशा प्रकारच्या अत्याचार , बलात्कार, छेडछाड, महीलांना जिवे मारणाऱ्या, नराधमांची संख्या भारतात , राज्यात वाढत जात आहे तरी असा प्रकार केल्यास नराधमाला बंदुकीच्या गोळ्या घालून जागीच मारण्यात यावे अशी विनंती केंद्र व राज्य शासनाला निवेदनाद्वारे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य केज तालुकाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी केली आहे या विषयी निवेदनाद्वारे सविस्तर वृत्त असे की नायब तहसिलदार आशा वाघ केज यांच्या मार्फत केंद्र व राज्य शासनाला रोहन गलांडे पाटील (अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य केज तालुकाध्यक्ष) निवेदनाद्वारे विनंती करतो की बदलापुर येथील झालेल्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच कोलकत्ता येथील हाॅस्पीटलमध्ये नर्सवर झालेल्या अत्याचार व अशा प्रकारच्या अत्याचार , बलात्कार, छेडछाड, महीलांना जिवे मारणाऱ्या, नराधमांची संख्या भारतात , राज्यात वाढत जात आहे त्यामुळे भारतातील, राज्यातील महीला,मुली , असुरक्षितन रहाता सुरक्षित असाव्यात म्हणून व होणाऱ्या अत्याचाराला नियंत्रण ठेवण्यासाठी असा प्रकार केल्यास नराधमाला बंदुकीच्या गोळ्या घालून जागीच मारण्यात यावे अशी विनंती केंद्र व राज्य शासनाला निवेदनाद्वारे विनंती करतो त्यामुळे भारतात , महाराष्ट्रराज्यात असे अनुचित प्रकार घडणार नाही व अशा प्रकारे होणारे अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाला निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली की बदलापुर, कोलकत्ता, येथील घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने यापुढे अत्याचार करणाऱ्या नराधमांना जागीच बंदुकीच्या गोळ्या घालून ठार करण्यात यावे असे आदेश केंद्र व राज्य शासनाने पोलिस प्रशासनाला देण्यात यावे अशी विनंती निवेदनाद्वारे शासनाला रोहन गलांडे पाटील यांनी केली आहे.