दंगेखोर मिलिंद एकबोटे याला विरोध करण्यासाठी दलित संघटना एकवटल्या.
केज शहरातील दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समित आक्रमक.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरात सकल मराठा संघा तर्फे भीमाकोरेगावच्या दंगलीचा आरोप असलेला मिलिंद एकबोटे यांचा कार्यक्रम ठेवला आहे या सगळ्याला विरोध म्हणून केज तालुक्यातील सर्व दलित संघटना एकवटलेल्या असून त्यानी दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती तर्फे आज केज तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. आक्रमक झालेल्या सर्व संघटनेतील कार्यकर्त्याने जोरदार घोषणा देऊन तहसील कार्यालयातील परिसर दणाणून सोडला या वेळेस आंबेडकर वादी तरुण खूप आक्रमक झाल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते.प्रत्येक कार्यकर्त्याची मागणी होती की मिलिंद एकबोटे याला केज शहरातील कार्यक्रमा वर बंदी आणून मिलींद एकबोटेला शहरात येण्यास प्रतिबंध करावा.या शेकडो आंबेडकर वादी कार्यकर्ते हजर होते.या वेळेस तहसीलदार सचिन देशपांडे यांना निवेदन देण्यात आली केज पोलीसांकडून चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.